"महाराष्ट्रामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६९:
 
मराठ्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर ब्रिटिश राजवटीत बेने इस्रायली समाज महाराष्ट्रातील इतर भागातही स्थायिक होऊ लागला. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बेने इस्रायली सैनिकांची कुटुंबे पुण्याच्या रास्ता पेठेत, विशेषत: लकेऱ्या मारुतीच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा स्थायिक झाली होती. त्याला ‘इस्रायली आळी’ असे नाव होते. त्यातील कित्येकांना खान बहाद्दुर, खानसाहेब अशा पदव्या मिळाल्या होत्या. ब्रिटिशकाळात सैन्यात नोकरी करणाऱ्या बेने इस्रायलींप्रमाणेच सरकारी नोकरीत काम करणारे बेने इस्रायलीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. सरकारी खात्यांपैकी रेल्वे, कस्टम, पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात अनेक बेने इस्रायली काम करत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील इतर भागांत व भारतातील इतर शहरांत वास्तव्य केले होते.
 
पुण्याच्या कँप भागातील प्रसिद्ध 'लाल देऊळ' हे ज्यूंचे प्रार्थानालय आहे.
 
१९६१ व १९७१च्या जनगणनेनुसार [[पुणे]], [[इगतपुरी]], [[भोर]], [[सातारा]], [[मुंबई]], [[ठाणे]] यांप्रमाणेच [[नाशिक]], [[सोलापूर]], [[सातारा]], [[नागपूर]], [[धुळे]], [[जळगाव]], [[अहमदनगर]], [[औरंगाबाद]], [[भंडारा]], [[वर्धा]], [[नांदेड]] येथेही कमी प्रमाणात का होईना; पण ज्यूंची नोंद झाली आहे.
 
==मुंबईतील ज्यू==
ईस्ट इंडिया कंपनीच्या कारकिर्दीत मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्यू आले. बेने इस्रायलींबरोबर बगदादी ज्यू, कोचीन ज्यू हेही आले. सन १७४६मध्ये बेने इस्रायली समाजातल्या आवसकर घराण्यातील पुरुषाने मुंबईतील खडक भागात सर्वात प्रथम घर बांधले. त्यानंतर दिवेकर कुटुंबीय त्यांच्या शेजारी राहण्यास आले.पुढच्या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेने इस्रायली दाखल होऊन या भागात त्यांची स्वतंत्र घरे उभी राहिली. त्यामुळे ही वस्ती ‘इस्रायली मोहल्ला’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मुंबईत बेने इस्रायली प्रार्थना मंदिर दिवेकर यांनी बांधले. या प्रार्थनालयात सेफेरतोरा आणण्यासाठी ते कोचीनला निघाले. प्रवासात त्यांचा अंत झाला. पुढे त्यांच्या वारसांनी सेफेरतोरा आणून प्रार्थनालय चालू केले. हेच मुंबईतील जुने शाआर हारा हमीम प्रार्थनालय हॊय. ते मांडवी भागातील एका रस्त्यावर सन १७९६मध्ये स्थापन झाले. म्हणूनच प्रार्थनालय असलेल्या रस्त्याला इंग्रजांनी सॅम्युएल स्ट्रीट असे नाव दिले. या प्रार्थनालयाला मशीद म्हटले जाई. यावरून तेथून जवळ बांधलेल्या रेल्वे स्टेशनला ‘मशीद बंदर’ (मसजिद) असे नाव देण्यात आले.
 
== हेही पहा ==