"श्रीकांत नारायण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: श्रीकांत नारायण (जन्म : १७ जानेवारी, इ.स. १९६८) हे एक मराठी गायक आणि...
(काही फरक नाही)

१३:००, २८ जुलै २०१७ ची आवृत्ती

श्रीकांत नारायण (जन्म : १७ जानेवारी, इ.स. १९६८) हे एक मराठी गायक आणि रंगमंच कलाकार आहेत. त्यांची मराठी, हिंदी, तामिळ. तॆलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत गायलेली अनेक गाणी ध्वनिमुद्रित झाली आहेत.

मुंबईतल्या अंधेरीमधील भवन्स कॉलेजमध्ये शिकत असताना श्रीकांत नारायण यांनी १९८५-८६ साली एका संगीत स्पर्धॆत विजय मिळाला आणि त्यांची संगीतातली कारकीर्द सुरू झाली. १९९० साली पदवी मिळाल्यानंतर ते मे अॅन्ड बेकर या औ़षध निर्मिती कंपनीत नोकरी करू लागले. ९९७ साली त्यांनी ती नोकरी सोडली आणि त्यांनी संगीतासाठी पूर्ण वेळ देऊन संगीतातच कारकीर्द करायचे ठरवले.

श्रीकांत नारायण यांनी [[कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड, शंकर महादेवन आणि सुदेश भोसले यांच्यासारख्या गायकांबरोबर अनेक रंगमंचीय कार्यक्रम केले.

मोहम्मद रफी नाइट्स

श्रीकांत नारायण हे १९९७ सालापासून दर वर्षी ३१ जुलै या रफीच्या स्मृतिदिनी काही गायकांच्या साथीने 'फिर रफी' हा कार्यक्रम सादर करतात. २५ डिसेंबर २०१२ रोजी मोहम्मद रफीच्या ८८व्या जयंतीच्य निमित्ताने त्यांनी मुंबईत 'पुकारता चला हूँ मैं' हा कार्यक्रम केला. सतत १२ तास चाललेल्या या कार्यक्रमात श्रीकांत नारायण हे रफीची १०१ गाणी गायले.

श्रीकांत नारायण यांची गाजलेली गाणी

सन्मान, पुरस्कार आणि यशप्राप्ती

  • श्रीकांत नारयण यांनी गायलेल्या 'डोल डोलतंय वाऱ्यावरी' या गाण्याला दुहेरी प्लेटिनम दर्जा मिळाला आहे.
  • महाराष्ट्र सरकारकडून कलाभूषण पुरस्कार
  • मध्य प्रदेश सरकारकडून जन परिषद पुरस्कार