"सरस्वती (दीर्घिकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर...
(काही फरक नाही)

१५:२९, १४ जुलै २०१७ ची आवृत्ती

सरस्वती हा पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणारा दीर्घिकांचा एका प्रचंड मोठा समूह (सुपरक्‍लस्टर) आहे. त्याचा शोध पुण्यातील 'आयुका' आणि 'आयसर' या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांनी ‘स्लोअन डिजिटल स्काय सव्हे'च्या आधारे लावला. आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. या शोधासंबंधीचा लेख अमेरिकन अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या 'द अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल' या मानाच्या नियतकालिकात ऑगस्ट २०१७च्या अंकात छापला जाईल.

सरस्वती या दीर्घिका समूहात हजारो दीर्घिका आहेत. त्यांतील कित्येक आपल्या आकाशगंगेहूनही प्रचंड मोठ्या आहेत. आकाशात हा समूह रेवती नक्षत्राच्या दिशेला आहे.