"अहुपे घाट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक घाटरस्ते आहेत त्यातलाच अह...
(काही फरक नाही)

२३:३७, ५ जुलै २०१७ ची आवृत्ती

घाटमाथ्यावरून कोकणात उतरणारे जे अनेक घाटरस्ते आहेत त्यातलाच अहुपे घाट हा एक पायरस्ता आहे. या घाटाची सुरुवात पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील अहुपे गावापासून होते आणि शेवट ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील देहेरी गावापाशी होतो.

मंचरपासून घोडेगाव-डिंभे रस्त्याने अहुपे ५२ किलोमीटरवर आहे. रस्ता वळणावळणाचा असून चालताना डावीकडे डिंभे जलाशय कायम दिसत असतो. अहुप्याच्या शेजारीच एक मोठा कडा आहे त्याला ढग असे म्हणतात. ऐन पावसाळ्यात या कड्यावरून एक धबधबा खाली कोसळताना दिसतो. स्थानिक लोक याला वाघमाचा धबधबा म्हणतात.

अहुप्याच्या अलीकडे असलेल्या पिपरगणे गावातून दुर्ग आणि धाकोबा ही शिखरे दिसतात. अहुप्याच्या अलीकडे एक छोटी देवराई आहे. तिच्या अलीकडे खाली घोड नदीचे उगमस्थान दिसते. पूर्वी इथे अश्वमुखी असलेल्या दरीतून पाण्याचा प्रवाह वाहत असे. त्यामुळे या प्रवाहाला-नदीला घोड नदी असे नाव पडले. अहुप्यातून कोकणातल्या खोपिवली गावी चालत जाता येते.

भीमाशंकरला जवळच असलेला अहुपे घाट हे अत्यंत रमणीय ठिकाण आहे.