"महेश भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महेश मुरलीधर भागवत (जन्म : पाथर्डी-अहमदनगर जिल्हा, १७ जून, १९६९) हे...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
महेश मुरलीधर भागवत (जन्म : पाथर्डी-अहमदनगर जिल्हा, १७ जून, १९६९) हे एक मराठी पोलीस अधिकारी आहेत. त्यांनी पुण्यातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. त्यानंतर ते आयपीएस झालेल्याझाले. भागवतांची ५-९-२००६ रोजी [[मणिपूर]]ची राजधानी [[इंफाळ]] येथे सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतरपुढे ते मणिपूर-त्रिपुरा केडरमधून आंध्र प्रदेश केडरमध्ये आले. १ जुलै २०१६पासून ते सायबराबाद (हैदराबाद-राचकोंडा)चे पोलीस आयुक्त आहेत.
 
==नक्षलवाद्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी केलेली धडपड==
ओळ ७:
[[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] नलगोंडाचे पोलीस अधीक्षक असताना यादगिरीगुट्टा येथील मानवी व्यापाराचे मोठे रॅकेट त्यांनी उघडकीस आणले. अडीचशे जणांना अटक केली. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रियांची सुटका केली. पीडितांची सुटका झाली आणि जबाबदारी संपली, असा विचार त्यांनी केला नाही. पीडित स्त्रियांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले. उदबत्त्या, भांडी निर्मितीचे, शिवणकामाचे शिक्षण दिले. या महिलांच्या मुलींच्या नशिबी वेश्याव्यवसायातले जीवन येऊ नये म्हणून सात ते पंधरा वयोगटातील मुलींना त्यांनी शाळेत पाठविण्याची व्यवस्था केली. प्रशासकीय अधिकारांचा कौशल्यपूर्ण वापर आणि अशासकीय संस्थांची मदत घेत त्यांनी शेकडो मुले, महिला, युवतींची नरकयातनांतून सुटका केली आहे.
 
==विशेष==
अंधश्रद्धा निर्मूलन समितीत डॉ. [[नरेंद्र दाभोलकर]] यांच्यासोबत आणि नर्मदा बचाओ आंदोलनात मेधा पाटकर यांच्यासोबत भागवतांनी काही काळ काम केले आहे.
 
==महेश भागवत यांना मिळालेले पुरस्कार==
वग:आअठी व्यक्ती]
* प्रेसिडेन्ट्स पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (PPMG)-२००४
* पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस (PMMS)-२०११
* लैंगिक शोषणासाठी आणि बाल किंवा इतरही मजुरीसाठी होणार्‍या मानवी तस्करीविरुद्ध केलेल्या कार्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने महेश भागवत यांना २०१७ सालचे ‘ट्रॅफिकिंग इन पर्सन्स रिपोर्ट हीरोज अॅवॉर्ड’ प्रदान केले आहे.
 
 
वग[[वर्ग:आअठीमराठी व्यक्ती]