"वैजयंती पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: डॉ. वैजयंती पटवर्धन या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल अस... |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ. वैजयंती पटवर्धन या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
वैजयंतीबाईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील अ.भि. गोरेगावकर शाळेतून झाले. त्यांच्या आई मीना
वैजयंती पटवर्धन सन २००६-०७ मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन(आयआयएम)च्या पुणे शाखेची अध्यक्षा झाल्या. शाखेच्या स्थापनेपासून एकही महिला अध्यक्ष झाली नसल्याने ५० वर्षांतील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळाला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विविध उपक्रमांसाठी आणि वाचनसंस्कृती वाढविण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला. आयएमएच्या ‘आरोग्यदीप’ या अंकाच्या संपादकपदाचे काम त्यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत सांभाळले. पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या दिवाळी अंकांकरिताही त्यांनी लेखन केले. याशिवाय वैजयंती पटवर्धनांनी विविध वृत्तपत्रांतून आणि मसिकांतून अनेक स्त्रीकेंद्रित कथा लिहिल्या.
समाजात प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याकरिता लेखन हेच एकमेव उत्तम साधन आहे, हे उमगल्यामुळे, पुणे महापालिकेमध्ये गर्भिलगनिदान कायद्याविषयीच्या समितीसाठी २००३ ते २०१० या कालावधीत काम करताना व्याख्याने व मार्गदर्शन शिबिरांसोबतच वैजयंती पटवर्धनांचे लेखन सुरू होते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम करताना त्यांनी ‘दिवा लागो देवा’ या लघुपटाचे त्यांनी निर्मिती केली. पुणे महापालिकेच्या कार्यक्रमांत व कार्यशाळांमध्ये १८ मिनिटांचा हा लघुपट दाखवून जनजागृती केली जात असते..
==वैजयंती पटवर्धन यांची पुस्तके==
* जन्म बाळाचा आणि आईचाही
(अपूर्ण)
|