"वैजयंती पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वैजयंती पटवर्धन या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल अस...
(काही फरक नाही)

१६:३३, १ जुलै २०१७ ची आवृत्ती

डॉ. वैजयंती पटवर्धन या एक स्त्रीरोगतज्ज्ञ असून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.

वैजयंतीबाईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील अ.भि. गोरेगावकर शाळेतून झाले. त्यांच्या आई मीना देशपांडेया शिक्षिका होत्यातर वडील सरकारी नोकरीत होते. वैजयंती पटवर्धन मुंबईत राहूनच एम.बी.बी.एस., एम.डी. झाल्या. शाळेत असल्यापासून त्यांनी मराठी वाचनाची आवड होती. आजही त्यांचे मराठी वाङ्‌मयाचे दांडगे वाचन आहे. याचा परिणाम म्हणून त्या ललित लेखन करतात. त्यांनी आणि त्यांच्या पतींनी मिळून इ.स. २००० साली ‘औक्षवंत’ हा दिवाळी अंक सुरू केला. वाचकाने स्वतःच्या आरोग्यात स्वतःचाच सहभाग वाढावा या उद्देशाने जनजागृती करण्यासाठीदिवाळी अंकात बाल, महिला कुटुंब, आरोग्य, वार्धक्य, पालकत्व असे वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले. त्याकरिता डॉ. ह.वि. सरदेसाई, डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. वैजयंती खानविलकर, डॉ. श्रीराम गीत यांसारख्या मान्यवरांनी लेखन केले. अंकाकरिता लेख आणून त्याचे संपादन करण्याचे काम पटवर्धन पतीपत्‍नी करीत असत. ‘औक्षवंत’ दिवाळी अंकाच्या दहा वर्षांच्या प्रवासात या अंकाला सात वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेची डोंबिवली शाखा, रोटरी क्लब अशा संस्थांचे पुरस्कार लाभले.