"समर्थ रामदास स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५३:
 
===व्यक्तिमत्त्व===
 
मध्यम उंची, मजबूत बांधा, गौर वर्ण, तेजस्वी कांति, कपाळावर लहानसे टेंगूळ, असे समर्थांचे स्वरूप होते. कमरेस लंगोटी, किंवा कधी कफनी, पायांत खडावा. लांब दाढी, जटा, गळ्यांत जपाची माळ, यज्ञोपवीत, हातांत कुबडी, काखेस झोळी, अशा थाटात समर्थांची रुबाबदार आणि दुसर्‍यावर छाप पाडणारी मूर्ती संचार करीत असे.
 
Line १६८ ⟶ १६७:
[[File:Dasbodh.jpg|thumb|शिवथर घळ येथील दासबोध लेखन ]]
 
समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते. त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या. आजही चाफळ, शिवथरघळ, सज्जनगड आणि समर्थांच्या वेगवेगळ्या घळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात. काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थांची तीर्थक्षेत्रे पाहतात. समर्थांना अंगापूरच्या डोहात दोन मूर्ती सापडल्या; एक श्रीरामचंद्रांची आणि दुसरी तुळजाभवानीची. त्यांतील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली. श्री तुळजा भवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले. सज्जनगडावरील प्रसिद्ध अंग्लाई देवीचे मंदिर आजही याची साक्ष देत आहे. सज्जनगडाच्या पायथ्याला समर्थांना एक बाग तयार करायची होती. या बागेत कोणकोणती झाडे लावावयाची आणि ती कशी लावावीत या संबंधीचे समर्थांचे स्वतंत्र प्रकरण आहे. यावरून त्यांचा वनस्पतीशास्त्राचा किती अभ्यास होता याची कल्पना येते. बाग प्रकरण म्हणून ओळखल्या जाणार्‍या या कवितेत समर्थांनी सुमारे ३५० वनस्पतींची नवे दिली आहेत. आश्चर्य म्हणजे यादी देताना पालेभाज्या, फळभाज्या, फळ, फूल, औषधी वनस्पती यांची व्यवस्थित वर्गवारी आहे. सज्जनगडावर दोन वर्षे राहून समर्थ शिवथरघळीत आले. तिथे त्यांनी समर्थ संप्रदायाचा श्रीमद दासबोध हा प्रधान ग्रंथ लिहिला. या ग्रंथात समर्थांनी प्रपंच, राजकारण, संघटन, व्यवस्थापन, व्यवहारचातुर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सभ्यता आणि शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. दासबोधातील मूर्खलक्षणे वाचत असताना तर अनेकांना वाटते की, समर्थांनी आपला स्वभाव अचूकपणे कसा ओळखला? जगातील अनेक भाषांमध्ये दासबोधाचा अनुवाद झाला आहे.
 
[[File:Ramdas aarati.jpg|thumb|श्री लवथवेश्वराचे पूजन]]
Line २३१ ⟶ २३०:
* [[सोलीव सुख ]], आणि
* अप्रसिद्ध असलेला हजारो पानी मजकूर
 
==रामदासांवरती लिहिलेली पुस्तके==
* श्रीसमर्थांची लघुकाव्ये (संपादक - डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
 
===|| अनुदिन नवमी हे मानसी आठवावी ||===
Line ३३५ ⟶ ३३१:
===रामदासस्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथ===
* आनंदवनभुवनी (कादंबरी, लेखिका : [[शुभांगी भडभडे]])
* ऐसी हे समर्थ पदवी (अशोक प्रभाकर कामत)
* संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर) (प्रकाशन दिनांक ११-६-२०१७)
* जय जय रघुवीर समर्थ (मराठी लघुपट, दिग्दर्शक जितेंद्र वाईकर)
* श्री समर्थाचें पुण्य स्मरण (शंकर धोंडो क्षीरसागर)
* राजगुरु समर्थ रामदास (शं.दा. पेंडसे)
* श्रीसमर्थ चरित्र ([[न.र. फाटक]]) (१९५१)
* रामदास : वाङ्मय आणि कार्य ([[न.र. फाटक]]) (१९५३)
* राजवाड्यांचा रामदास : ([[राजवाडे]] लेखसंग्रहाअंतर्गत, संपादन [[द.वा. पोतदार]])
* रामदास (श.श्री. पुराणिक)
* समर्थ रामदासांची साहित्‍य सृष्‍टी (लेखक : सुनील चिंचोलकर; प्रकाशक :महाराष्ट्र सरकार)
* रामदास : वाङ्मय आणि कार्य ([[न.र. फाटक]]) (१९५३)
* श्रीसमर्थ चरित्र ([[न.र. फाटक]]) (१९५१)
* श्रीसमर्थचरित्र (सदाशिव खंडो आळतेकर) (शके १८५५)
* श्रीसमर्थप्रताप (समर्थांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले गिरिधरस्वामी)
* समर्थ रामदास विवेक दर्शन (संत रामदास, साहित्य अकादमी प्रकाशन)
* सद्‌गुरू समर्थ रामदास और छत्रपति शिवाजी महाराज (हिंदी, लेखक सुरेश तोफखानेवाले)
* श्रीरामदासस्वामि-चरितम् (संस्कृत, श्रीपादशास्त्री हसुरकर, शके १८४४)
* समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज ([[कौस्तुभ कस्तुरे|कौस्तुभ सतीश कस्तुरे]])
* समर्थ रामदास स्वामी (मराठी चित्रपट, दिग्दर्शक राजू सावंत)
* श्रीसमर्थांचा गाथा (संपादक [[अनंतदास रामदासी]], १९२८)
* समर्थ रामदासांची साहित्‍य सृष्‍टी (लेखक : सुनील चिंचोलकर; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
* श्रीसमर्थांची लघुकाव्ये (संपादक - डॉ. सुनीती सहस्रबुद्धे)
* श्री समर्थाचें पुण्य स्मरण (शंकर धोंडो क्षीरसागर)
 
===समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट===