"दत्तात्रय पारसनीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (जन्म : बोरगांव-कोरेगांव ताल...
(काही फरक नाही)

१८:५९, २१ जून २०१७ ची आवृत्ती

रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस (जन्म : बोरगांव-कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा, २७ नोव्हेंबर १८७०, मृत्यू : ३१ मार्च १९२६). हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक होते. यांच्या आईचे नाव बयाबाई. पारसनीसांचे घराणे मूळचे सातारा जिल्ह्यातील मळवडीचे. वडील बळवंतराव महसुली खात्याच्या नोकरीनिमित्त सातार्‍यास आले आणि स्थायिक झाले.

द.ब. पारसनीसांचे शिक्षण इंग्रजी सहावीपर्यंतच झाले असले तरी त्यांनी इ.स. १८८७मध्ये महारष्ट्र कोकिळ हे मासिक सुरू केले. त्या मासिकातून मराठेशाहीतील प्रसिद्ध व्यक्तींशी संबंधित कागदपत्रे प्रसिद्ध होत. १८९२सालापर्यंत हे मासिक चालू होते.

ऐतिहासिक कागदपत्रे प्रसिद्ध करता यावीत म्हणून पारसनीसांनी ‘भारतवर्ष’ आणि ‘इतिहास संग्रह’ नावाची नियतकालिके चालू केली. ‘भारतवर्ष’ वर्षभरातच बंद पडले पण ‘इतिहास संग्रह’ आठ वर्षे चालले. या नियतकालिकांतून पारसनीसांनी सहा हजारांहून अधिक अस्सल ऐतिहासिक कागदपत्रे प्रकाशित केली.

द.ब. पारनीसांनी लिहिलेली पुस्तके

  • ए.ओ. ह्यूम (१८९३)
  • कीर्तिमंदिर (१८९२
  • झांशीच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र (१८९४)
  • दिल्ली अथवा इंद्रप्रस्थ (१९०२)
  • पूना इन बायगॉन देज (इंग्रजी, १९२१)
  • बायजाबाई शिंदे यांचे चरित्र (१९०२)
  • महापुरुष ब्रह्मेंद्रस्वामी यांचे चरित्र व पत्रव्यवहार (१९००)
  • महाबळेश्वर (१९१६)
  • मराठ्यांचे आरमार (१९०४)
  • महादजी शिंदे यांजकडील राजकारणे (पाच खंड, १९१५)
  • द सांगली स्टेट (इंग्रजी, १९१७)
  • सातारा (१९०९)
  • हिस्टरी ऑफ द मराठा पीपल (३ खंड, इंग्रजी, १९१२ ते १९२२)