"विवेक (अभिनेता)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''गणेश अभ्यंकर''' तथा '''विवेक''' ([[१६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१८|१९१८]] - [[९ जून]], [[इ.स. १९८८|१९८८]]) हे मराठी कृष्णधवल चित्रपटांतील अभिनेता होते.
 
विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते होते. देखणे, प्रसन्‍न व्यक्तिमत्त्व आणि सहजसुंदर अभिनय यामुळे सिनेरसिकांमध्ये विवेक यांना आदराचे स्थान होते. १९४४ सालच्या [[भक्तीचा मळा]] या चित्रपटाद्वारे त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. १९५०च्या [[बायको पाहिजे]] या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी अभ्यंकर यांना ''विवेक'' असे नाव दिले. हे नाव अभ्यंकरांनी पुढे वापरले. कुडतरकर आणि गणेश अभ्यंकर हे [[मुंबई]]तील [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]]चे एका बाकावर बसणारे सहाध्यायी होते.
 
विवेक यांनी सुमारे ८० चित्रपटांमधून आणि १० नाटकांमधून भूमिका केल्या आहेत.