"खारफुटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८३:
 
२६ जुलै २००५ला निर्माण झालेल्या मुंबईतील पूरस्थितीमध्ये खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे महत्त्व अधोरेखित झाले होते. खाडीकिनारी घुसलेल्या पाण्यामुळे अनेक संसार होत्याचे नव्हते झाले होते. ज्या ठिकाणी खारफुटी मोठ्या प्रमाणात होती त्या ठिकाणी पुराचा फटका बसला नव्हता. त्यानंतर केवळ खारफुटीचा बचाव नव्हे, तर खारफुटीचे संवर्धन करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. आता केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे खारफुटीला वन कायदा लागू आहे. वन कायद्याच्या धाकामुळे सध्या देशभरातील जंगल वाचलेले पाहावयास मिळत आहे; पण मुळात खारफुटीला वन कायदा लागू होऊनही त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. मध्यंतरी ठाणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर ठाणे परिसरातील खारफुटीचे क्षेत्र निश्‍चित करण्याची मागणी शासनाकडे केली होती. एक स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतीत अशा प्रकारे पुढाकार घेत असताना थेट शासनाशी संबंध असलेला महसूल विभाग अथवा स्थानिक तहसीलदार हातावर हात धरून बसल्याचे पाहावयास मिळत आहे. महापालिकेकडून अनेक वेळा बोटींमधून खारफुटीची पाहणी करून कोठे कोठे खारफुटी विरळ होत आहे याचा अंदाज घेतला जात आहे; पण महसूल विभागाने केवळ रेती उत्खननमाफियांवर कारवाई करताना खारफुटींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. कळवा परिसरात वेगाने होत असलेल्या खारफुटीच्या र्‍हासाला महापालिकेबरोबरच महसूल विभागही तेवढाच जबाबदार असल्याचे दिसते आहे.
 
==खारफुटीचे धार्मिक महत्त्व==
सुंदरबनात ‘बनबिबी’ नावाची देवता खारफुटीच्या जंगलाची देवता समजली जाते व हिंदू-मुस्लीम तिला सारखेच पूजतात.
 
भारतात चेन्नईजवळ चिदंबरम् येथील नटराजाच्या देवळात एका खारफुटीच्या झाडाची ‘स्थल वृक्ष’मूर्ती स्थापन केली आहे. भाविक आजही तिला पूजतात.
 
ठाणे जिल्ह्यातील काही गावी खारफुटीचे संरक्षण करणारी एक गाव समिती असते, या समितीमार्फत मर्यादित प्रमाणात खारफुटीचे लाकूड गोळा करता येते. पण कोणीही जर मर्यादेपेक्षा जास्त लाकडे तोडली तर समिती निवाडा करून मर्यादाभंग करणार्‍याला शिक्षा देते. शिक्षेनुसार त्या व्यक्तीला रात्रभर खारफुटीच्या झाडाला बांधून ठेवायची तरतूद आहे. इतकी कडक शिक्षा ठेवल्यामुळे कोणीही या वनस्पतीचा दुरुपयोग करीत नाही व या वनस्पतीचे संवर्धनही योग्य रीतीने होते.
 
गोव्यात खारफुटींना योग्य मान देऊन त्यांचे जतन करण्यासाठी ‘मांगे थापणी’ नावाची पूजा पौष अमावस्येला करतात व मगरीची मातीची मूर्ती करून तिची पूजा केली जाते.
 
==हे सुद्धा पहा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/खारफुटी" पासून हुडकले