"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
म.सा.प. अर्थात '''महाराष्ट्र साहित्य परिषद''' या महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्थेची स्थापना दि.२७ मे १९०६ रोजी [[पुणे]] येथे चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली.
[[चित्र:महाराष्ट्र साहित्य परिषद logo.png|right|महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह]]
 
==इमारत==
==सभासदत्व==
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यालय पुण्यातील टिळक रोडवर, पूर्वी मळेकर वाडा म्हणून ओळखल्या जाणार्‍या वास्तूत आहे. या इमारतीत ‘[[माधवराव पटवर्धन सभागृह]]’, एक ग्रंथालय आणि त्यातच संदर्भ गंथालय आहे. इमारतीच्या तळघरात खासगी संस्था पुस्तक प्रदर्शने भरवतात.
 
==माधवराव पटवर्धन सभागृह==
मसापच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, पत्रिकेचे संपादक आणि १९३६ साली जळगावला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशा त्रिविध नात्यानी प्रसिद्ध कवी माधव जूलियन तथा माधवराव पटवर्धन यांचे २९ नोव्हेंबर १९३९ रोजी पुण्यात अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सारा महाराष्ट्र हळहळला. मसापने त्यांचे यथोचित स्मारक करण्याची योजना आखून निधी गोळा करण्यास प्रारंभ केला. साहित्यिक [[वि.द. घाटे]] आणि रावसाहेब रघुवेल लुकस जोशी या दोघांच्या विशेष प्रयत्‍नांमुळे संकल्पित निधी जमला. फलटणचे मालोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी या सभागृहासाठी ३५०० रुपयांची देणगी दिली आणि २९ नोव्हेंबर १९४१ रोजी माधवराव पटवर्धन सभागृहाची कोनशिला साहित्यसम्राट [[न.चिं. केळकर]] यांच्या हस्ते बसविण्यात आली. या सभागृहातील भिंतीवर सभागृहाच्या दर्शनी भागात लावलेले आणि नी.म. केळकर यांनी रेखाटलेले माधवराव पटवर्धन यांचे तैलचित्र आहे. त्याशिवाय भिंतींवर आजवरच्या सर्व साहित्य संमेलनाध्यक्षांची समान आकारमानाची छायाचित्रे लावली आहेत.
 
==मसापचे सभासदत्व==
मसापचे फक्त आजीव सभासदत्व मिळते. इतर कोणत्याही प्रकारचे सदस्यत्वाची सोय नसल्याने खर्च विचारात घेता, फक्त लहान वयाची किंवा अगदी तरुण मंडळीच सभासद होण्याची इच्छा करतात.
 
Line १० ⟶ १६:
 
मुंबई, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र हे 'मसाप'चे कार्यक्षेत्र आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात ६५ शाखा आहेत. त्यापैकी केवळ २० शाखांचे कामकाज नियमित सुरू असावे. 'मसाप'च्या आजीव सभासदत्वासाठी मिळणार्‍या शुल्कातील ४० टक्के रक्कम ही शाखांना दिली जाते. त्याचप्रमाणे विभागीय साहित्य संमेलनासाठी ५० हजार रुपयांचा निधी दिला जातो. शाखा मेळाव्यासाठी पूर्वी असलेल्या २५ हजार रुपये निधीची तरतूद वाढवून ४० हजार करण्यात आली आहे.
 
काही संस्था तांत्रिकदृष्ट्या शाखा नसल्या तरी त्यांचे कार्य म.सा.प. समानच आहे.