"मॅथ्युनी मॅथ्यूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मूळचे भारतातील केरळचे असलेले मॅथ्युनी मॅथ्यूज (जन्म : केरळ, इ.स....
(काही फरक नाही)

०६:१३, २४ मे २०१७ ची आवृत्ती

मूळचे भारतातील केरळचे असलेले मॅथ्युनी मॅथ्यूज (जन्म : केरळ, इ.स. १९३६; निधन : २१ मे, इ.स. २०१७) हे कुवेतमधील एक व्यावसायिक होते. १९५६मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी कामाच्या शोधात ते कुवेतला गेले. टोयोटा कंपनीत टंकलेखक म्हणून त्यांनी काम सुरू केले. १९८९ मध्ये या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांना टोयोटा सनी या टोपणनावाने ओळखले जात होते.

१९९०मध्ये इराकने कुवेतवर हल्ला केल्यानंतर तेथे अडकून पडलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मॅथ्यूज यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॅथ्यूज यांच्या प्रयत्‍नांनी आणि समयसूचकतेमुळेच लाखो भारतीयांचा जीव वाचला होता. कुवेतमध्ये त्यावेळी उद्भवलेली परिस्थिती पाहता मॅथ्यूज त्यांच्या कुटुंबासमवेत सहजपणे भारतामध्ये येऊ शकत होते. पण, त्यांनी तसे न करता कुवेतमध्ये असणार्‍या भारतीयांची जबाबदारी घेत जवळपास १ लाख ७० हजार भारतीयांना आधार देत एअरलिफ्ट करून भारतात यशस्वीरीत्या सुरक्षित परत आणले.

मॅथ्युनी मॅथ्यूज यांच्या या कामगिरीवर बेतलेला ‘एअरलिफ्ट’ हा चित्रपटही गाजला होता. अक्षयकुमारने मॅथ्यू यांची भूमिका साकारली असली तरी एअरलिफ्टचे खरे हिरो मॅथ्युनी मॅथ्यूज होते. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.