"धोला सदिया पूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ब्रम्हपुत्रा नदीवर बांधलेला डोला-सदिया पूल हा भारतातील सर्वात ल...
(काही फरक नाही)

२३:०२, २२ मे २०१७ ची आवृत्ती

ब्रम्हपुत्रा नदीवर बांधलेला डोला-सदिया पूल हा भारतातील सर्वात लांब पूल आहे. सुमारे सव्वानऊ किलोमीटर लांबीच्या या पुलाची वजन पेलण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यामुळे हा पूल नागरिकांसोबत लष्करालाही वापरता येतो. हा पूल मुंबईतील बांद्रा-वरळी सीलिंकच्या तिप्पट लांब आहे.चीनच्या सीमेजवळ पायाभूत सुविधांचे जाळे बळकट करण्याच्या उद्देशाने या पुलाची निर्मिती झाली. चीनच्या सीमेपासून हा पूल अवघा १०० किमी दूर आहे.

या ढोला-सदिया पुलाच्या बांधकामाला इ.स. २०११मध्ये सुरुवात झाली आणि त्याचे उद्‌घाटन २६-५-२०१७ रोजी होत आहे. पुलाच्या बांधकालाला ९५० कोटी रुपयांचा खर्च आला असून हा पूल आसामची राजधानी दिसपूरपासून ४५०, तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरपासून ३०० किलोमीटर अंतरावर आहे. एकही नागरी विमानतळ नसलेल्या अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांना या पुलामुळे दिब्रूगढ विमानतळावर सहजपणे पोचणे शक्य झाले.

पुलाची वैशिष्ट्ये

  • हा पूल ६० रणगाड्यांचे वजन पेलू शकतो.
  • पुलाची रुंदी ४२ फूट आणि लांबी ३०,३५० फूट.
  • ब्रह्मपुत्रा नदीतून ढोला ते सादिया हे अंतर कापण्यास साडेचार तास लागत. पुलावरून ते अंतर अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात पार करता येते.


वर:पूल