"गुरुनाथ नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावानी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिका त्यांनी लिहिल्या.
 
==रहस्यकथालेखनाचा ओनामओनामा==
१९७० साली कामानिमित्त पुण्यात आले आसताना त्यांन सदानंद प्रकाशनचे खाडिलकर भेटले. त्यांनी नाईक यांना दोन रहस्यकथा लिहून देण्याची विनंती केली. नाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले आणि ते कामाला लागले.
 
नेमका त्याच काळात अलका चित्रपटगृहात 'किस द गर्ल्स अॅन्ड मेक देम डाय' हा इंग्रजी चित्रपट पाहिला. डोक्यात कथा लिहून देण्याचे विचार सुरू होते. अचानक चित्रपट अर्धवट सोडून ते उठले आणि थेट रूमवर गेले. रात्री दोन वाजेपर्यंत जागून त्यांनी पहिली ‘मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही रहस्यकथा लिहून काढली. सकाळीच ही कथा त्यांनी खाडिलकरांना सोपविली. घरी परतताच 'शास्त्रज्ञाच्या मृत्यूचे गूढ' ही दुसरी रहस्यकथा तयार झाली. तीही खाडिलकरांना सोपवून ते बेळगावला निघून गेले. थोड्याच दिवसात खाडिलकरांचे पत्र आले. तुमच्या आणि गजाननाच्या कृपेने तुमच्या दोन्ही कादंबर्‍या छापत आहोत, कृपया निघून यावे. आणि गुरुनाथ नाईक रह्स्य कादंबरीकार झाले.
 
नाईक यांच्या कादंबर्‍यांना बाजारात चांगली मागणी होती. महिन्याकाठी ते ७-८ कादंबर्‍य ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत.