"वर्तक बाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: वर्तक बाग हा पुणे शहरातील एक बगीचा आहे. ही वर्तक बाग शनिवार पेठे...
(काही फरक नाही)

०७:४६, २० मे २०१७ ची आवृत्ती

वर्तक बाग हा पुणे शहरातील एक बगीचा आहे. ही वर्तक बाग शनिवार पेठेतल्या ओंकारेश्वर मंदिराच्या मागे आहे. पेशव्यांनी इ.स. १७३८मध्ये ओंकारेश्वर मंदिराचे बांधकाम पूर्ण केले आणि कालांतराने देवळाला लागणार्‍या फुलांसाठी बागेची जागा नेमून दिली. तयार झालेल्या या बागेचे क्षेत्रफळ चार एकर होते. बागेत फुलांखेरीज वांगी आदी भाज्या लावल्या होत्या. कडुनिंबाची आणि पेरूची झाडेसुद्धा लावली होती.

या ओंकारेश्वराच्या बागेमध्ये एक भुडकी (नदीच्या काठापाशी बांधलेली विहीर) होती. शनिवार पेठेतल्या वर्तक बागेत या भुडकीचे अवशेष पहायला मिळतात. भुडकीत बहुधा पाणी आणून टाकावे लागते.

दुसरी वर्तक बाग

पुण्यात एरंडवणा भागात राजा मंत्री रस्त्यावर आणखी एक वर्तक बाग होती. आता तेथे वर्तक हेरिटेज नावाची इमारत आहे. तिच्या पत्त्यामध्ये वर्तक बागेचा उल्लेख होतो.