"जगन्नाथ वाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
==नोकरीचे प्रयत्‍न==
जगन्नाथ वाणी यांनी सुरुवातीच्या काळात म्हणजे १९६० ते ६२ या दरम्यान धुळे जिल्ह्यातील शेतकी महाविद्यालयात गणित विषयांची अर्धवेळ प्राध्यापकी आणि खाजगी शिकवण्याही केल्या, पण मनासारखी नोकरी मिळेना. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्येही ते काही महिने होते, काही ठिकाणी वशिलेबाजी, अंतर्गत राजकारणही नोकरी मिळण्याच्या आणि नोकरी टिकण्याच्या मार्गात आड येई. अशा काळात राष्ट्र सेवादलातील शिबिरांच्या निमित्ताने भेटलेला मित्र जी.पी.पाटील कामी आला. तो त्यांच्या अगोदर, मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिल्या दहांत येऊन पुढे संख्याशास्त्र विषयात एम्‌.एस्‌‌सी. पदवी घेऊन कॅनडातील मॅकगिल विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. त्याच्या मदतीने जगन्नाथ वाणींना त्याच विद्यापीठात गणितीय संख्याशास्त्र (मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स)मधे पीएच.डी. करण्यासाठी प्रवेश व आर्थिक मदत मिळाली.
 
इ.स. १९६७मध्ये पीएच.डी. झाल्यावर '''जगन्नाथ वाणी''' पुढे कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि तेथूनच १९९५मध्ये निवृत्त झाले. त्या विद्यापीठात त्यांनी विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रम, शिका व कमवा योजना, विविध शिष्यवृत्त्यांची निर्मिती, कॅलगरी विद्यापीठाचा पुणे विद्यापीठस्थित परदेश सत्र अभ्यासक्रम, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भारतातील पहिल्या विमाशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या स्थापनेसाठी चालना, असे काही शैक्षणिक प्रकल्प सुरू केले होते.
 
पुढे त्यांच्या पत्‍नीला झालेल्या स्किझोफ्रेनियासारख्या दाहक अनुभवातून धडा घेऊन, या आजाराबद्दल ते अधिक माहिती मिळवू लागले. त्यांनी १९८०मध्ये 'स्किझोफ्रेनिया सोसायटी ऑफ अल्बर्टा' या संस्थेची स्थापना केली. कॅलगरी विद्यापीठात 'स्किझोफ्रेनिया' या विषयावर संशोधन व अध्यासनाची निर्मिती व शिष्यवृत्तीची आर्थिक तरतूदही केली गेली. त्याच धर्तीवर डॉ. जगन्नाथ वाणी यांनी भारतामध्ये १९९७ साली 'स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन' (सा) या संस्थेची स्थापना केली. आजारी व्यक्ती व कुटुंबीयांसाठी स्व-मदत गट, जनजागृती कार्यक्रम आणि धायरी (पुणे) येथे प्रशस्त वास्तुनिर्मिती करून डॉ. जगन्नाथ वाणींनी तिथे पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. त्यांनीच 'देवराई' या चित्रपटाची निर्मिती करून 'स्किझोफ्रेनियाविषयीची जनजागृती घरांघरांत पोहोचवली.
 
जगन्‍नाथ वाणींच्या पत्‍नी कमलिनी वाणी स्किझोफ्रेनियासारखा आजार घेऊनही दीर्घ काळ जगल्या; त्या शेवटी ३१ डिसेंबर २०१६ रोजी मरण पावल्या.
 
डॉ. जगन्नाथ वाणी इ.स. १९६५सालापासून कॅनडाचे नागरिक आहेत. त्यांना कॅनडा सरकारने ३१ डिसेंबर २०१२ ला 'ऑर्डर ऑफ कॅनडा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. समाजकार्य, संगीत, आरोग्य, मानसिक आजारांविषयी जनजागृती, शिक्षण, अपंग पुनर्वसन अशा अनेकविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.
 
डॉ.जगन्नाथ वाणी यांनी मानसिक आरोग्य, तत्त्वज्ञान, शिक्षण, भारतीय संगीत, यासंबंधित क्षेत्रांमधे १८ सामाजिक संस्था स्थापन केल्या आहेत. कॅनडात अत्यंत व्यग्र दिनक्रम असताना अणि शरीरात कॅन्सर असताना ते भारतात येऊन विविध संस्थांचे कामकाज पहात असत आणि सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेत असत.
 
==जगन्नाथ वाणींचे इतर समाजकार्य==