"माती गणपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नारायण पेठेतला '''माती गणपती''' हा पुण्यातील मोठ्या मूर्ती असलेला ए...
(काही फरक नाही)

२२:२४, १० मे २०१७ ची आवृत्ती

नारायण पेठेतला माती गणपती हा पुण्यातील मोठ्या मूर्ती असलेला एक गणपती आहे. ही गणपतीची मूर्ती संपूर्ण मातीची आहे असे सांगितले जाते. मातीच्या मूर्तींपैकी ही सर्वात जुनी, म्हणजे इसवी सनाच्या अठराव्या शतकातील मूर्ती आहे. मूर्तीचा आणि मंदिराचा इतिहास ज्ञात नाही.

माती गणपतीची ही मूर्ती चार ते साडेचार फूट उंच असून दोन ते अडीच फूट रुंद आहे. तिच्या चार हातांपैकी डावा खालच्या बाजूचा हात, दुमडलेल्या डाव्या पायावर ठेवलेला असून त्याच हातावर सोंड टेकलेली आहे. गणपती उजव्या हाताने अभय देतो आहे. वरच्या हातांमध्ये शस्त्रे नाहीत.

देवळाच्या गाभार्‍यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. सभामंडपात शिवलिंग व विष्णू-लक्ष्मीच्या मूर्ती आहेत.

इ.स. १९९८मध्ये देवळाचा जीर्णोद्धार झाला. पानशेतच्या पुरात संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले अस्ताही गणपतीच्या या मातीच्या मूर्तीला काहीही झाले नाही; इतकेच काय पण देवापुढील शंख आणि घंटाही हलली नाही.

या माती गणपतीच्या देवळाची मालकी श्रोत्री कुटुंबाकडे आहे.