"एस.डी. इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: {{गल्लत|श्री.दि. इनामदार}} एस. डी. इनामदार हे एक मराठी साहित्यिक आहे...
(काही फरक नाही)

१५:४९, १० मे २०१७ ची आवृत्ती

एस. डी. इनामदार हे एक मराठी साहित्यिक आहेत. कथालेखक, वैचारिक लेखन करणारे आणि समीक्षक अशी त्यांची बहुपेडी वाङ्मयीन गुणवत्ता आहे.

इनामदारांनी लिहिलेल्या ‘रूपबंध’ या पुस्तकात त्यंनी पाश्चात्त्य आधुनिक कलेतील विविध तत्त्वप्रणाली, कलासंप्रदाय व चळवळींची माहिती देतानाच, त्यामागच्या सैद्धांतिक भूमिकाही मांडल्या आहेत. त्याशिवाय दृश्यकला-ललितकला, दृश्यकला-ललित साहित्य, आधुनिक कलेला वेगळा आयाम देणारे कलाकार आणि त्यांच्या कलाकृती... असा मोठा पट चितारला आहे. चिंतनात्मक बैठक असलेला आणि एवढा मोठा पसारा असलेला हा मराठीतला बहुधा पहिलाच ग्रंथ असावा. ‘रुपवेध’ची ही व्यापकता लक्षात घेऊनच या ग्रंथाला २०१७ सालचा केशवराव कोठावळे पुरस्कार देण्यात आला.

एस.डी. इनामदार यांनी लिहिलेली पुस्तके

  • अरण्यरुदन (कथासंग्रह)
  • काचेचा पिंजरा (अनुवादित कादंबरी)
  • खेळिया (कथासंग्रह)
  • दिगंतराचे पक्षी (अनुवादित कादंबरी)
  • नागरिक (कथासंग्रह)
  • प्राक्तनाचे वेध (समीक्षाग्रंथ)
  • मर्मभेद (दिवंगत तत्त्वज्ञ मे.पुं. रेगे यांच्या वैचारिक लेखांचे संकलन-संपादन)
  • रंगसावल्या (कथासंग्रह)
  • रूपबंध (कलाविषयक समीक्षाग्रंथ)


पुरस्कार

  • २०१७ या वर्षासाठी असलेला केशवराव कोठावळे पुरस्कार.