"वसंत नरहर फेणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
वसंत नरहर फेणे (जन्म : इ.स. १९२७) हे एक मराठी साहित्यिक आहेत.
 
वसंत नरहर फेणे यांचे बालपण मुंबईतल्या जोगेश्वरी भागात गेले. त्यांच्या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांचे वडील वारले. त्यानंतर त्यांच्यासह भावंडांना घेऊन आई कारवारला गेली. तिथल्या मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावाबरोबर सातार्‍याला आले आणि तिथून वर्षभरातच पुन्हा कारवारला परतले. काही वर्षांनंतर ते मुंबईला आले आणि त्यांनी पुढचे सगळे शिक्षण मुंबईतच पूर्ण केले.
 
वसंत नरहर फेणे यांना नोकरीच्या निमित्ताने पुणे, कोल्हापूर, विजापूर, नाशिक अशी भटकंती करावी लागली. या काळातील अनुभवांतूनच त्यांच्यातील लेखक घडत आणि प्रगल्भ बनत गेला. दिवाळी अंकांसाठी लेखन करणारे महत्त्वाचे लेखक म्हणून फेणे यांना ओळखले जाऊ लागले. त्यांनी वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर १९७८ साली नोकरी सोडून पूर्णवेळ लेखन-वाचनाला वाहून घेतले. कादंबरी, कथा, नाटक, विनोदी लेखन, अनुवाद अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांचे अधिक लिखाण प्रामुख्याने कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांमध्ये आहे
 
==वसंत नरहर फेणे यांनी लिहिलेली पुस्तके==