"बाहुलीचा हौद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्यातील शुक्रवार पेठेतील दगडूशेठ दत्त मंदिराजवळ असलेल्या हौ...
(काही फरक नाही)

१३:३५, ५ मे २०१७ ची आवृत्ती

पुण्यातील शुक्रवार पेठेतील दगडूशेठ दत्त मंदिराजवळ असलेल्या हौदाला बाहुलीचा हौद म्हणत.

पुण्यातील डॉक्टर विश्राम घोले हे एक फार मोठे शल्यविशारद होते. ते गवळी समाजातील एक बडे प्रस्थ असून पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समिती अध्यक्ष होते. ते महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर होते; आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते सुधारक होते.

महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन डॉ. घोले यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली. सुरुवात आपल्या घरातून करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली हिला शिकवण्यास आरंभ केला. वय अवघे ६-७ असलेल्या या अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत बाहुलीच्या शिकण्याला डॉक्टर घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती व महिलाना त्यांची ही कृती पूर्णपणे नापसंत होती, किंबहुना त्यांचा प्रखर विरोध होता. डॉक्टर घोले यांना समजविण्याचा प्रयत्‍न अनेकदा जातीतील मान्यवरांनी केला. जातीतून बहिष्कृत करण्याची धमकीही दिली. पण डॉक्टर घोले यांनी कुठल्याही आक्षेपांना भीक घातली नाही. शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तींनी.काचांचा लाडू खाल्ल्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन बाहुली मृत्युमुखी पडली.

आपल्या लाडक्या लेकीच्या-बाहुलीच्या- स्मरणार्थ आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉक्टर घोल्यानी बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातिधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला. त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी (बहुधा १८९२ साली) ठेवल्याची नोंद आहे.