"मुक्ता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ७९:
 
२०१६ मध्ये [[लोकमत]] महाराष्ट्रियन ऑफ द इयर (मराठी थिएटर मधील मुक्ताच्या कार्यासाठी) आणि जुलै २०१६ मध्ये निळू फुले चतुरस्र अभिनेत्री पुरस्काराने मुक्ताला गौरविले गेले.<ref name="Nilu Phule sanman 2016">url=https://twitter.com/ColorsMarathi/status/758668154008637440</ref> महाराष्ट्र वन चॅनेलच्या महिलादिन विशेष "सावित्री सन्मान २०१६" सोहळ्यात मुक्ताला तिच्या सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कराने गौरविले गेले.<ref name="Savitri sanman 2016">url=https://www.youtube.com/watch?v=WwnEnL0H8dE&t=4830s</ref> मुक्ताचा सन्मान करताना श्री. वामन केंद्रे यांनी "Mukta is most talented girl around us. मुक्ता महाराष्ट्राला, भक्ती बर्वेनंतर पडलेलं स्वप्न आहे" या शब्दात गौरविले.<ref name="Savitri sanman 2016">url=https://www.youtube.com/watch?v=WwnEnL0H8dE&t=4830s</ref> नोव्हेंबर २०१६ मध्ये पुलोत्सव २०१६ तर्फे मुक्ताचा तरुणाई सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.<ref name="Pulotsaw 2016">url=http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pu-La-awards-for-Ameen-Sayani-Mirasdar/articleshow/55320773.cms</ref>
मुक्ताने व्यावसायिक रंगभूमीवर मोजक्या नाटकांत कामे करून रंगभूमीवरील आपले अस्तित्व कायम ठेवले. २०१५ आणि १६ मध्ये तिने काही नाटकांची निर्मिती केली. २०१५ साली संस्पेंस थ्रिलर प्रकारातील लव्हबर्ड्‌स मध्ये काहीशी नकारात्मक छटा असलेली देविका तिने साकारली.<ref name="Lovebirds">url=http://www.loksatta.com/manoranjan-news/lovebirds-marathi-drama-1103671/</ref> २०१५ मध्ये रत्‍नाकर मतकरी लिखित "इंदिरा" या नाटकाची निर्मिती केली. २०१६ मध्ये, भारतीय सैन्याच्या पार्श्वभूमीवरचे "कोडमंत्र" हे नाटक मुक्ताने रंगभूमीवर आणले. या नाटकातील सैनिकी कायदातज्ज्ञ अहिल्या देशमुखचे पात्र मुक्ताने साकारले.<ref name="Codemantra">url=http://marathicineyug.com/theatre/news/1298-mukta-barve-s-marathi-play-code-mantra-opens-from-18-june-2016</ref> त्याचे प्रयोग सुरू असतानाच या नाटकावर आधारित एका पुस्तकाची निर्मिती करावी, असा विचार तिच्या मनात आला व तिने ‘कोडमंत्र’ या नावानेच एक पुस्तक तयार केले. नुकत्याच झालेल्या नाटकाच्या दीडशेव्या प्रयोगाला त्याचे प्रकाशन करण्यात आले. सैनिकांच्या आयुष्यावरील ‘कोडमंत्र’ या नाटकाच्या टीमने या नाटकावर आधारलेल्या पुस्तकाच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम सैनिक कल्याण निधीला देण्यात येत आहेत. सुरुवातीला मुक्ता बर्वे अणि तिच्या टीमने ५१००० रुपये महाराष्ट्र राज्याच्या सैनिक कल्याण निधीसाठी दिले आहेत. ’कोडमंत्र’च्या सुरुवातीला एक हजार प्रती छापण्यात आल्या. काही महिन्यांतच त्याची पहिली आवृत्ती संपली. ‘अ फ्यू गुड मेन’ या इंग्रजी नाटकावर कोडमंत्र नाटक आधारलेले असून त्यामध्ये सैनिकांची निष्ठा, त्यांची शौर्यगाथा, त्यांचे जगणे, शिस्त अशा अनेक पैलूंचा मागोवा घेण्यात आला आहे.
 
मराठी रंगभूमीवर नवनवीन नाट्य प्रयोग करून पाहायला नेहमीच उत्सुक असलेल्या मुक्ता बर्वे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये नसीम सोलेमानपूर (इराणी लेखक) लिखित आणि सिद्धेश पूरकर अनुवादित (मराठी अनुवाद) "व्हाईट रॅबिट रेड रॅबिट" या नाटकाचा पुण्यात [[भरत नाट्य मंदिर]] येथे प्रयोग सादर केला.<ref name="WRRR">url=http://sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5461738112727328060&SectionId=5131376722999570563&SectionName=Features&NewsTitle=A%20real%20%E2%80%98live%E2%80%99%20theatrical%20experience</ref><ref name="WRRR2">url=https://www.youtube.com/watch?v=g0h95nb5lY0</ref> जगभरातील अनेक भाषांमधील अनुवादित झालेल्या सदर नाटकाचे वैशिष्ट्य त्याच्या उत्फूर्त सादरीकरणात होते. दिग्दर्शक नाही आणि संहितेचे सादरीकारणापूर्वी वाचन नाही, कलाकाराला थेट रंगमंचावर संहिता हातात मिळते, नाटकात एका कलाकाराला एकच प्रयोग सादर करता येतो. रंगमंचावर कलाकाराने संहिता वाचत वाचत कलाकार आणि प्रेक्षकांनी नाटकाचा सह-अनुभव घ्यायचा अशा कलाकारासाठी धाडसी आणि प्रेक्षकांसाठी नवख्या वाटाव्या अशा प्रयोगाचे चॅलेंज मुक्ताने अगदी सहजी पेलले.<ref name="White rabbit red rabbit">url=http://epaper.indianexpress.com/1033496/Indian-Express-Pune/December-12,-2016#page/23/2</ref>