"ओवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ओवी हा मराठी काव्यामधील एक छंद आहे. ओवीचे साधारणपणे दोन प्रकार आहेत. ग्रंथांमधील ओवी व लोकगीतातील ओवी.
'जसे सुचेल तसे रचले' असे वाटणाऱ्या ओवीचा उगम वैदिक आणि अनुष्टुभ छंदात आढळतो.
 
==मराठी ओवीचा इतिहास==
ओवीचा उगम इसवी सन ११२९पर्यंत मागे नेता येतो. त्या काळातल्या सोमेश्वरकृत अभिलषितार्थचिंतामणी नाम ग्रंथात ओवीचा पुढीलप्रमाणे उल्लेख आला आहे – महाराष्ट्रेषु योविद्भिरोवी गेया तु कण्डने।
 
महाराष्ट्रातल्या स्त्रिया कांडण व दळण करताना ओवी गातात, असा त्याचा अर्थ आहे. वरील अवतरणात ओवी ही संज्ञा छंद या अर्थी योजिली आहे. महानुभाव पंथात इसवी सनच्या १६व्या शतकाच्या अखेरीस भीष्माचार्य नामक एक ग्रंथकार झाला. त्याने मार्गप्रभाकर या आपल्या ग्रंथात दिलेले ओवीचे लक्षण असे – गायत्रीछंदापासौनी धृतिपर्यंत। ग्रंथ वोवीयांचे तीन चरण जाणावे मिश्रित। प्रतिष्ठे पासौनि जगतीपर्यंत। चौथा चरण॥
 
==ग्रंथांमधील ओवी==
Line १०४ ⟶ १०९:
 
== संदर्भ ग्रंथ==
* ओवी छंद : रूप आणि आविष्कार (लेखिका - रोहिणी तुकदेव) (प्रतिमा प्रकाशन)
* केळकर-मंगळूरकर, मुंबई विद्यापीठ, राजवाडे प्रत
[[वर्ग:मराठी साहित्य]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ओवी" पासून हुडकले