"पंढरपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ६८:
 
==परिसर==
नदीकाठी चौदा [[घाट]] बांधलेले आहेत. मात्र ते सलग नाहीत. पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे १.२ किमी. वर विष्णुपद-वेणुनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस सुमारे १.६ किमी. वर गोपाळपूर येथे गोपालकृष्णाचे देऊळ आहे. यांशिवाय पंचमुखी [[मारूती]], भुलेश्वर, पद्मावती (देऊळ आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रुक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेवमंदिर, शाकंभरी (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारुती, मुरलीधर, गारेचा महादेव, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, काळा मारूती, चोफाला (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त, बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. अलीकडे काही नवीन मंदिरेही झाली असून येथील [[कैकाडी महाराजांचा मठ]] प्रेक्षणीय आहे. १९४६ मध्ये साने गुरुजींनी [[महात्मा गांधीं]]चा विरोध डावलून, हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात प्रवेश मिळावा म्हणून [[उपवास]] केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व गोविंदबुवा अंमळनेरकर, गोविंदबुवा चोपडेकर, भानुदास महाराज वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.
 
===नदीवरील घाट===
*१ अमळनेर
Line ११८ ⟶ ११९:
विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे, पंढरपूर. विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे, पंढरपूर.विठ्ठलमंदिर हे अर्थातच गावातील सर्वप्रमुख मंदिर आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा (भीवरा) नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला ‘चंद्रभागा’ म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाचे देवालय (समाधी) आहे. येथून विठ्ठलमंदीर सु. २०० मी. आहे. मध्यवस्तीतील हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची पूर्व-पश्चिम लांबी सु. १०७ मी. व दक्षिणोत्तर रूंदी सु. ५२ मी. आहे. देवळास तटबंदी असून त्याला पूर्वेस तीन, दक्षिणेस एक, पश्चिमेस एक व उत्तरेस तीन असे एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास बारा पायऱ्या आहेत. त्यांतील पहिली पायरी ही नामदेव पायरी होय. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोपऱ्यात संत चोखामेळा याची समाधी आहे. नामदेव दरवाजाने आत जाताच छोटा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. नंतरच्या चौकात तीन दीपमाळा व प्रल्हादबुवा बडवे आणि कान्हया हरिदास यांच्या समाध्या आहेत.
 
तसेच येथे गरुडाचे व [[समर्थ रामदास|समर्थ रामदासांनी]] स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरूंद दगडी मंडपाच्या (सोप्याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बांजूंस जयविजय हे द्वारपाल व [[गणेश]] आणि [[सरस्वती]] आहेत. मघल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावताराची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. बाजूच्या खोलीवजा दालनांत [[काशी विश्वनाथ]], राम-लक्ष्मण, [[काळभैरव]], [[दत्तात्रेय]], नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दूसरा खांब सोन्याचांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्वी गरुडस्तंभ होता असे सांगतात. या खांबाला मिठी घालून मग पुढे जातात. यानंतर चौखांबी मंडप आहे. तेथे उत्तरेस देवाचे शेजघर आहे. नंतरची चौरस जागा ‘कमान’ नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मी. पेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा [[पाय]] दुखावला होता; तेव्हापासून पायांस न कवटालथा त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबहिर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेशमंदिर, त्यासमोर नागोबा, [[बाजीराव पेशवे|बाजीराव पेशव्याने]] बांधलेली ओवरी तसेच लक्ष्मिमंदिर आहे. ओवरीत [[नारद|नारदाची]] व कोपऱ्यात रामेश्वराची मूर्ती असून पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठलमंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. जवळच सत्यभामा व राही यांच्या खोल्या आहेत. सभामंडपाच्या पायऱ्या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळखांबी मंडपात आले म्हणजे एका भिंतीत ‘चौऱ्याऐंशीचा शिलालेख’ असून त्यावर देवी आहे. जन्ममरणांच्या फेऱ्यांतून सुटण्यासाठी लाखो भाविकांनी या शिलालेखाला पाठ घासल्यामुळे तो गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ.इत्यादी विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.
 
==इतर मंदिरे==
Line १२६ ⟶ १२७:
*शिंदे सरकार द्वारकाधिश मंदिर
* केशवराज मंदिर - नामदेव समाज
 
==पंढरपूरच्या समृद्ध वारशाची जपणूक : योजना==
पंढरपूरचा वारसा जपणे, तेथील मठ, फड, मंदिरे यांचा इतिहास शोधणे यासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने डॉ. [[सदानंद मोरे]] आणि [[वा. ल. मंजूळ]] यांच्याकडे हा एक प्रकल्प सोपविला होता. २०१५ सालच्या जुलै महिन्यात हा प्रकल्प पूर्ण झाला आणि त्याचे तपशील ग्रंथरूपाने लोकांसमोर येत आहेत.{{संदर्भ हवा}}
Line १५१ ⟶ १५३:
* मूळ अभ्यासक डॉ. हर्षे यांचे मनोगत
* संशोधनाची मीमांसा
 
==पंढरपूरचा स्थापत्त्यशास्त्रीय अभ्यास==
पुणेकर संशोधक वैशाली लाटकर यांनी ‘आर्किटेक्चरल स्टडीज ऑफ पंढरपूर’ असा संशोधन प्रकल्प हाती घेऊन तो पुरा करत आणला आहे. (मार्च २०१७ची बातमी).
 
वैशाली लाटकर या कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट असून त्या या प्रकल्पावर पाच वर्षे काम करीत होत्या. त्या पाच वर्षांत त्यांनी पंढरपूरमधील शेकडो जुन्या वास्तू, मंदिरे, मठ, फड आणि घाट यांचा स्थापत्त्यशास्त्रदृष्ट्या अभ्यास केला. पंढरपुरात यादवकाळापासूनच्या वास्तू आढळतात. कित्येक मंदिरे, मठ, वाडे, घाट आणि फड यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. तो जसा लिखित स्वरूपात आढळतो त्यापेक्षाही त्या काळाचे थेट साक्षीदार असणाऱ्या म्हणजे तत्कालीन वास्तूंच्या स्वरूपात आढळतो. वास्तुसंवर्धकतज्ज्ञ या नात्याने काम करताना वैशाली लाटकर यांनी पंढरपुरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तूंचा प्रामुख्याने विचार केला. त्यांमध्ये मंदिरे, मठ, फड, जुने वाडे, घाट अशा वास्तूंचा समावेश आहे. त्यांच्या मते, फड ही वास्तू फक्त पंढरपूरमध्येच आढळते. पुराण वाङ्मयात येथील वास्तूंचे खूप संदर्भ आढळतात. ह्या वास्तूंमध्ये अनेक जुन्या वस्तू आणि हस्तलिखिते यांचे जतन केलेले आहे. हे सारे आपल्या सांस्कृतिक वैभवाचे स्रोत आहेत, मात्र ते कायम दुर्लक्षित राहिलेले आहेत, असे त्या म्हणतात. त्या वास्तूंचा स्थापत्त्याच्या अंगाने अभ्यास आता झाला आहे.
 
==पंढरपूर माहात्म्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंढरपूर" पासून हुडकले