"पंढरपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १३१:
पंढरपुरातील छोटे उद्योग कुंकू-बुक्का-अष्टगंध, उदबत्ती तयार करणारे कारखाने, तुळशीच्या माळा आणि लाखेच्या बांगड्या तयार करणारे कारागीर, जुने ऐतिहासिक वाडे, जवळपासचे पंचक्रोशीतील मंदिरे, त्यांचा इतिहास, धार्मिक महत्त्व आदी गोष्टी महत्त्वाच्या मानून, त्याचा या प्रकल्पात सविस्तर अभ्यास केला गेला आहे.
 
==पंढरपूरमधील मठमठांचा आणि फडांचा इतिहास==
वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरमधील मठ, फड आणि दिंड्यांचा ग्रंथबद्ध इतिहास प्राचीन हस्तलिखितांचे अभ्यासक [[वा.ल. मंजूळ]] यांनी एका प्रकल्पाद्वारे केला असून त्यांना संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. [[सदानंद मोरे]] यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 
पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा, काíतकी एकादशी, चत्री आणि माघी एकादशीनिमित्त वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी ज्या वास्तू अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, त्यांना ‘मठ’ अशी संज्ञा आहे. तसेच या भौतिक रचनेपलीकडे जाऊन, तत्त्वज्ञानाच्या आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला ‘फड’ असे म्हटले जाते. पंढरपूरमध्ये असे अनेक मठ आणि फड अस्तित्वात आहेत. त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरीही आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा मठ, फड आणि दिंडय़ा यांचे महत्त्व आहे. त्यामुळे मठ-फडांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा, ही कल्पना सर्वप्रथम ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. ग. हर्षे यांना सुचली होती. तसा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला होता. पण, त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. डॉ. हर्षे यांनी सुरू केलेल्या कामाचे तपशील [[वा.ल. मंजूळ]] यांना उपलब्ध झाले आणि त्यात मोलाची भर घालून त्यांनी पंढरपूरमधील मठ-फडांचा-दिंड्यांचा इतिहास शब्दबद्ध केला.
 
;ग्रंथात काय आहे ?:
* पंढरपूरमधील ४० प्रमुख मठांचा इतिहास
* साडेतीनशे दिंड्यांचा इतिहास
* ६० फडांची माहिती
* मठ, फड, दिंडी यांच्या व्याख्या आणि महत्त्वाच्या नोंदी
* मूळ अभ्यासक डॉ. हर्षे यांचे मनोगत
* संशोधनाची मीमांसा
 
== संकीर्ण माहिती ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंढरपूर" पासून हुडकले