"द.ना. धनागरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
डॉ. द.दत्तात्रेय ना.नारायण धनागरे (जन्म : [[वाशीम, १९३६; मृत्यू : [[पुणे]], ७ मार्च २०१७) हे [[कोल्हापूर]] विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्यांचे वडील [[वाशीम]] येथे वकील होते.
 
डॉ. धनागरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. अमेरिकेतील प्रख्यात एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्च पदवी घेतली. त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी कानपूरच्या आयआयटीत अध्यापन कार्य केले. त्यानंतर ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू झाल्यावर त्यांची कारकीर्द खूप गाजली. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारसह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्‍वस्त होते.
 
तत्त्वज्ञान आणि मानववंशशास्त्र अशा दोन्हींच्या ऐतिहासिक संदर्भामधून भारतात समाजशास्त्रीय विद्याशाखेची रचना झाली आणि त्यामध्ये मूलभूत संशोधन करणाऱ्यांपैकी डॉ. धनागरे हे एक होत.
 
==डाॅ. धनागरे यांनी लिहिलेली पुस्तके==
* उच्च शिक्षण - ध्येयवादाकडून बाजारपेठेकडे (शैक्षणिक सदर लेखन संग्रह)
* नागरी समाज, राज्यसंस्था आणि लोकतंत्र : भारतीय संदर्भात विवेचन
* संकल्पनाचे विश्व आणि सामाजिक वास्तव (वैचारिक)