"द.ना. धनागरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

कृषी अशांतता कृषी संरचना
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. द. ना. धनागरे (जन्म : [[वाशीम, १९३६; मृत्यू : पुणे, ७ मार्च २०१७) हे...
(काही फरक नाही)

०७:२४, ९ मार्च २०१७ ची आवृत्ती

डॉ. द. ना. धनागरे (जन्म : [[वाशीम, १९३६; मृत्यू : पुणे, ७ मार्च २०१७) हे कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. त्यांचे वडील वाशीम येथे वकील होते.

डॉ. धनागरे यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथे झाले. अमेरिकेतील प्रख्यात एमआयटी विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्रातील उच्च पदवी घेतली. त्यानंतर आग्रा विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे त्यांनी कानपूरच्या आयआयटीत अध्यापन कार्य केले. त्यानंतर ते पुणे विद्यापीठात रुजू झाले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू झाल्यावर त्यांची कारकीर्द खूप गाजली. भारतीय समाजविज्ञान संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) सदस्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले. इंडियन सोशिओलॉजिकल सोसायटीच्या जीवनगौरव पुरस्कारसह अन्य काही संस्थांचे जीवनगौरव तसेच अन्य पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुंबईतील एशियाटिक सोसायटीचे ते विश्‍वस्त होते.

डाॅ. धनागरे यांनी लिहिलेली पुस्तके

(अपूर्ण)