"कृष्णा किरवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (जन्म : ४ मे, इ.स. १९५४; मृत्यू : कोल्हापूर, ३...
(काही फरक नाही)

२१:५९, ४ मार्च २०१७ ची आवृत्ती

डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले (जन्म : ४ मे, इ.स. १९५४; मृत्यू : कोल्हापूर, ३ मार्च, इ.स. २०१७) हे: महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. किरवले हे मूळचे बीड जिल्ह्यातील टाकळी आचार्य (ता. परळी वैजनाथ) गावचे होते. नोकरीनिमित्ताने ते सोळा वर्षांपूर्वी कोल्हापूरला आले व या शहराच्या सामाजिक चळवळीचे महत्त्वाचे अंग बनून गेले.

डॉ. किरवले यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात झाले. तिथेच १९८० ला ते एम.ए. झाले. पुढे १९८७ ला त्यांनी ‘दलित शाहीर व त्यांची शाहिरी’ या विषयावर पीएच. डी. केली. पुण्यातील गरवारे वाणिज्य महाविद्यालयातून १९८७ पासून साहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाचे काम सुरू केले. त्यानंतर पुणे विद्यापीठातही काम केले. पुढे २००२ ला ते शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात रुजू झाले. मराठी विभागाचे ते दोन वेळा प्रमुख होते. विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचेही संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. दलित आणि ग्रामीण शब्दकोश निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी आंबेडकरी चळवळ, शाहिरी या विषयांवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे. या चळवळीचा भाष्यकार अशी त्यांची महाराष्ट्राला ओळख होती.

सन्मान