"रझिया पटेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४१:
 
शहरात आल्यावर रझिया छात्र युवा संघर्ष वाहिनी नावाच्या युवक संघटनेत दाखल झाली. तेथे तिला स्वातंत्र्य म्हणजे काय ते समजले. संघटनेच्या पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करताना तिला आदिवासी वस्तींमधून फिरायला मिळाले; आसाम आंदोलनांसारख्या अनेक आंदोलनांत सहभागी व्हायला मिळाले. अशा रीतीर्ने दलित, महिला, विद्यार्थी वगैरे क्षेत्रांत काम करता करता एक दिवस रझिया पटेल ह्या छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या राष्ट्रीय संयोजक झाल्या.
 
==चित्रपट पाहण्यावर बंदी==
सन १९८२मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरातील मुस्लिम पंचायतने फतवा काढून मुसलमान स्त्रियांना सिनेमा गृहात जाऊन चित्रपट पाहण्याची बंदी केली. याविरुद्ध रझिया पटेलने अन्य मुसलमान स्त्रियांना घेऊन मोठे आंदोलन केले आणि शेवटी त्यांनी ८ मार्च १९८२च्या महिला दिनादिवशी मोठ्या संख्येत मोर्चा काढून चित्रपटगृहांत प्रवेश केला व सिनेमाबंदी तोडल्याची घोषणा करण्यात आली. मोर्चाच्या आणखी एका मागणीनुसार जळगावच्या त्या मुस्लिम पंचायत समितीवर सरकारने बंदी आणली.
 
==कारकीर्द==