"वाल्देमार हाफकीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
| धर्म =[[ज्यू धर्म]]
| कार्यक्षेत्र =[[सूक्ष्मजंतुशास्त्र]], [[प्रोटोझोआ]]चा अभ्यास
| कार्यसंस्था =[[इंपेरियरइंपीरियर नोवोरिसीयानोव्हॉरेशिया विद्यापीठ]]</br>[[जेनिवा विद्यापीठ]]</br>[[पास्चरपाश्चर इन्स्टिट्यूट]]
| प्रशिक्षण_संस्था =[[इंपेरियरइंपीरियर नोवोरिसीयानोव्हॉरेशिया विद्यापीठ]]
| ख्याती =पटकीप्रतिबंधक लस
| ख्याती =हैजा-रोधी टिका{{मराठी शब्द सुचवा}}
| पुरस्कार =
}}
डॉ. '''वाल्देमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन''' ([[रशिया|रशियन]]: Мордехай-Вольф Хавкин) ([[१५ मार्च]], [[इ.स. १८६०]]:[[बेर्डीन्स्क]], [[रशियन साम्राज्य]] - [[२६ ऑक्टोबर]], [[इ.स. १९३०]]:[[लुझान]], [[स्वित्झर्लंड]]) हे एक [[रशिया|रशियन]] सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते. हाफकीन हे [[यहूदी]] धर्मीय होते. [[पॅरिस]]मधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलराविरोधी लस विकसित करून तिचे [[भारत]]ात यशस्वीरीत्या परीक्षण केले. ते [[पटकी]] आणि ब्युबॉनिक [[प्लेग]] (गाठीचा प्लेग) वरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात.
 
मुंबईत परळ येथील सूक्षजीवशास्त्रात संशोधन करणार्‍या आणि विविध लसींचे उत्पादन करणार्‍या संस्थेला [[हाफकीन इन्स्टिट्यूट]] असे नाव आहे.
 
==हाफकीन इन्स्टिट्यूटचा इतिहास==
डॉ. वाल्देमार हाफकीन हे लुई पाश्चरचे विद्यार्थी होते. ते मार्च १८९३मध्ये हिंदुस्थानात आले आणि कलकत्त्यातील कॉलर्‍याच्या साथीविरुद्ध त्यांनी जणू एकाकी युद्ध पुकारले. पॅरीसमध्ये असताना त्यांनी विकसित केलेली कॉलर्‍याची लस ते लोकांना टोचू लागले. या लसीचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर, मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबईत आणि पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलावले. १८९६मध्ये मुंबईत आल्यावर तेथील गव्हर्नरने हाफकीन यांना जेजे इस्पितळाच्या परिसरात एक प्रयोगशाळा उभारून दिली. हाफकीनने प्लेगच्या लसीचा शोध लावण्याचे आव्हान स्वीकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली. या लशीचा पहिला प्रयोग हाफकीनने १० जानेवारी १८९७ रोजी स्वतःवरच केला. लशीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास सुरुवात केली. आणि खरोखरच पुण्या-मुंबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली. या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या.
 
पुढे १० ऑगस्ट १८९९ रोजी गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईच्या गव्हर्नरांचा एकेकाळचा राहण्याचा परळ येथे असलेला महाल डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन यांच्या स्वाधीन केला. तेथे डॉ. हाफकीनने ’प्लेग रिसर्च लॅबॉरेटरी’ स्थापन केली व स्वतः हाफकीन त्या संस्थेचे प्रमुख संचालक झाले. त्यांनी १९०४मध्ये हिंदुस्थान सोडल्यानंतर, १९०६मध्ये त्या संस्थेचे नाव बाँबे बॅक्टेरिऑलॉजी लॅबॉरेटरी झाले आणि १९२५मध्ये [[हाफकीन इन्स्टिट्यूट]] झाले.
 
== बाह्य दुवे ==