"दिघी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दिघी हे पुण्याचे उपनगर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक ग...
(काही फरक नाही)

०७:२६, ११ फेब्रुवारी २०१७ ची आवृत्ती

दिघी हे पुण्याचे उपनगर असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक गाव आहे. तेथे सन १९५९मध्ये ग्रामपंचायत झाली, आणि १९५९मध्ये शाळा झाली. १९९६मध्ये हे गाव महापालिकेत समाविष्ट झाले.

दिघी हे गाव आळंदी-पुणे रस्त्यावरील ज्ञानेश्वरांच्या पालखी मार्गावरील गाव आहे. गावाच्या चारही बाजूंना लष्कराच्या विविध आस्थापना आहेत. दिघी गावाशेजारच्या दत्तगड टेकडीवर दत्ताचे देऊळ आहे. याशिवाय गावात गावाचे ग्रामदैवत भैरवनाथाचे मंदिर, तसेच व्बिठ्ठल-रुक्मिणी, गणपती, शंकर मारुती, शनी, खंडोबा, साईबाबा, काळुउबाई, यमाई, दिव्याई, मरीआई आदी देवदेवतांची मंदिरे आहेत.

पालखी रस्त्यामुळे गावाचे पूर्व दिघी आणि पश्चिम दिघी असे दोन भाग झाले आहेत.