"मंगलगिरी साडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मंगलगिरी हे आंध्र प्रदेशातल्या गुंटुर जिल्ह्यात विजयवाडा आणि ग...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
मुळातली मंगलगिरी साडी ही शुद्ध टिकाऊ सुती साडी असून साडीच्या अंगात कोणतीही नक्षी विणली जात नाही. पण निझामी काठ मात्र सलगपणे वापरली जाणारी पद्धत आहे. ह्या दोन्ही गोष्टी मंगलगिरी साडीची वैशिष्ट्ये म्हणून ओळखली जातात. हातमागाचे विणकाम आणि ते पण तलम सुताचा वापर करून, त्यामुळे साडीची किंमत मात्र जास्त असते.
 
मंगलगिरी साडीतील विशेष म्हणजे साडीमध्ये खास आदिवासी डिझाइन विणलेले असते. आणि सुती साडीमध्ये जरी किंवा सोनेरी धाग्याने बारीक चौकडीचौकड्या विणल्या जातात. साडीच्या पदरावर आदिवासी संस्कृतीशी नाते सांगणारे पट्टेदार डिझाइन विणले जाते. त्याकरिता सोनेरी धाग्याने भरतकाम केले जाते. साडीचे रंग मात्र गडद आणि आल्हाददायक असतात. या साड्या विणण्याकरिता आणलेल्या सुताची धुलाई, नंतरची ब्लीचिंगची किंवा रंगाईची व्यवस्थापण गावातच होते. सुमारे ५००० विणकर या कामात गुंतलेले आहेत.
 
टिकाऊपणा ही या साडीची आणखी एक जमेची बाजू आहे. या साड्या व ड्रेस मटेरियल विणल्यामुळे गावच्या ८०,००० लोकसंख्येपकी निम्म्या लोकांना रोजगार मिळाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे सुती कुडते, दुपट्टे, स्टोल, शबनम पिशव्या इत्यादी उत्पादनेही तयार केली जातात.
 
मात्र अलीकडच्या काही वर्षांत हल्ली मंगलगिरी साड्या या कॉटन, सिल्क आणि कॉटन-सिल्क अशा तीनही प्रकारांत पहायला मिळतात. जरीचा काठ आणि साडीच्या मधला भाग पोकळ हे याही साड्यांचे वैशिष्ट्य आहे
 
मंगलगिरी सुती कापड हे बाजारात मंगलगिरी यार्डेज या नावाने विकले जाते.