"वंदना घांगुर्डे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
गांगुर्डे कुटुंबाने १९५५ साली डॉ. [[वसंतराव देशपांडे]] वर्षिक स्मृती महोत्सवात अन्य काही कलाकारांना घेऊन [[संगीत मानापमान]] नाटकाचा प्रयोग केला.आणि वंदना घांगुर्डे यांची नाट्यकारकीर्द सुरू झाली. त्यासाठी त्यांनी ‘नादब्रह्म परिवार’ नावाची संस्था स्थापन केली आणि पुढील काही वर्षांत अभिजात संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन, निर्मिती आणि प्रयोग सादरीकरण करायला सुरुवात केली. या संस्थेचे कट्यार काळजात घुसली, मत्स्यगंधा, [[संगीत मानापमान|मानापमान]], रणदुंदुभी, विद्याहरण, संन्यस्त खड्ग, [[संशयकल्लोळ]], [[संगीत स्वयंवर|स्वयंवर]] आदी संगीत नाटकांच्या सादरीकरणाबरोबरच शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे कार्यक्रम करणे चालू आहे.
 
==वंदना आणि डॉ. रवीन्द्र घांगुर्डे यांनी सादर केलेले अन्य कार्यक्रम==
* दीनानाथ मंगेशकरांच्या गायकीचे स्नरण करून देणारा ‘दिना-रंग’ हा कार्यक्रम याचे एका वर्षात (१९९९-२०००) ५०हून अधिक प्रयोग झाले आहेत.
* संगीत मानापमान या नाटकाचे एका वर्षात ५०हून अधिक प्रयोग.
* ई-टीव्ही दूरचित्रवाणी वाहिनीवरून सावरकरांच्या संन्यस्तखड्ग या नाटकाचे सादरीकरण.
* नादब्रह्म परिवारातर्फे दरवर्षी साजरा होणारा दीनानाथ मंगेशकर हा संगीत नाट्यमहोत्सव (इ.स. १९९६पासून)
 
मुंबईच्या मराठी साहित्य संघात संन्यस्तखड्ग सादर करण्याचे आवाहन संघाचे डॉ. बाळ भालेराव यांनी केले. पण गंधर्वाचीबाल गंधर्वांची भामिनी, रुक्मिणी, सुभद्रा, करावयास तयार असणार्‍या मराठीतील नामवंत अभिनेत्री-गायिकांना दीनानाथांनी भूमिका केलेल्या रणदुंदुभीमधील तेजस्विनी, राजसंन्यासमधील शिवांगी, सुलोचना या नायिकांची कामे करण्याची हिंमत झाली नाही. शेवटी वंदना घांगुर्डे यांनी संन्यस्तखड्गमधील सुलोचनेची भूमिका स्वतःच करायचे ठरवले. या नाटकाचे ४५हून अधिक यशस्वी प्रयोग झाले आहेत. दीनानाथांची गायकी पेलवणार्‍या त्या बहुधा एकुलत्या एक अभिनेत्री-गायिका आहेत.
 
‘मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे संगीत रंगभूमीवरील योगदान-एक चिकित्सक अभ्यास’ हा विषय घेऊन वंदना घांगुर्डे यांनी पीएच.डीसाठी प्रबंध सादर केला आहे. त्यांनी दीनानाथ मंगेशकर यांचे जीवन व संगीत यांवर ‘ब्रीद तुझे जगी दीनानाथ’ हे विश्लेषणात्मक पुस्तक लिहिले आहे.
 
==अन्य==
Line २८ ⟶ २९:
==पुरस्कार==
* वंदना घांगुर्डे यांच्या नादब्रह्म संस्थेला मा. दीनानाथ आनंदमयी पुरस्कार (२००४)
* वंदना घांगुर्डे यांना पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्कार (२०१३)
* आचार्य अत्रे पुरस्कार (२०१४)
* पुण्याच्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेकडून डॉ. रवींद्र घांगुर्डे व वंदना घांगुर्डे यांना 'लक्ष्मी नारायण दांपत्य' पुरस्कार (२०१५)