"न.म. जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. नरसिंह महादेव जोशी (जन्म : गारवडे, ११ जानेवारी, इ.स. १९३६) हे एक मर...
(काही फरक नाही)

००:१८, २३ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

डॉ. नरसिंह महादेव जोशी (जन्म : गारवडे, ११ जानेवारी, इ.स. १९३६) हे एक मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक आहेत. लहान असताना वर्तनमापत्रे टाकणार्‍या जोशींनी पुढे विविध ग्रंथांचे ग्रंथांचे लेखन केले. बालसाहित्य व शिक्षणक्षेत्राविषयक सखोल चिंतन हे न.म. जोशी यांचे वैशिष्ट्य आहे.

न.म. जोशी हे मूळचे पाटण तालुक्यातील गारवडे गावाचे. हे अगदी लहान गाव सातारा जिल्ह्यात असून अत्यंत दुर्गम जागी वसले आहे. जोशी यांची लहानपणाची पहिली पाच वर्षे या गावात गेली. जोशींचे आजोबा वामन नारायण जोशी हे आनंद संगीत मंडळीत गायक-नट होते. वडील महादेव वामन जोशी हे शाहूनगरवासी नाटक मंडळीत व्यवस्थापक होते. पुढे ही कंपनी बंद पडल्यावर ते पुण्याला आले आणि आचार्‍याचा व्यवसाय करू लागले. न.म. जोशींच्या आईचे नाव अन्‍नपूर्णा महादेव जोशी. त्यांनी न.म. जोशींना सातार्‍याला आणले व पहिलीत घातले. पुन्हा गारवड्याला येऊन त्यांचे दुसरीपासूनचे शिक्षण सुरू झाले. चौथीपर्यंत गावात शिकल्यावर ते पाचवी ते सातवी या वर्गांसाठी सोलापूरला आले, आठवीसाठी जळगावला, नववीसाठी सांगलीला आणि दहावीसाठी पुण्याला आले. काकांच्या बदल्यांमुळे त्यांच्या शालेय शिक्षणाची अशी त्रिस्थळी यात्रा झाली.

डॉ. न.म. जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आंबेडकरांचे चरित्र
  • कथानम (गौतम बुद्ध, कोलंबस, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्यापासून अगदी सामान्यांशी संबंधित बोधकथांचा संग्रह)
  • काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले? (अनुवादित, मूळ आंबेडकरलिखित What Congress & Gandhi have done to the Untouchables?)
  • चरित्रकथा (काही महान व्यक्तींच्या आयुष्यातील एकूण २६० प्रसंग)
  • जगणारी माणसं (बाल एकांकिका)
  • डॉक्टर-रोगी-यम (बाल एकांकिका)
  • तीन एकांकिका (बाल एकांकिका)
  • दत्तक राजपुत्र (बालनाट्य)
  • निश्चयाचा महामेरू (बाल एकांकिका)
  • निःस्पृह (रामशास्त्री प्रभुणे यांची चरित्रात्मक कादंबरी)
  • प्रेषित (कादंबरी)
  • फत्तेवाडीचा झुंझार (बालकादंबरी) : या कादंबरीवर आधारित एकपात्री प्रयोग झाले.
  • बखर एका सारस्वताची (आत्मचरित्र)
  • बिनखात्याचा मंत्री (बाल एकांकिका)
  • मशाल (एकांकिका)
  • मोहनदास करमचंद (चरित्रात्मक कादंबरी)
  • सह्याद्रीचा सुपुत्र (यशवंतराव चव्हाणांचे चरित्र)
  • हल्लकल्लोळ आणि इतर एकांकिका (बाल एकांकिका)
  • हिंदुत्वातील कूट प्रश्न (अनुवादित, मूळ आंबेडकर लिखित इंग्रजी, रिडल्स इन हिंदुइझम)

डॉ. न.म. जोशीं यांच्यासंबंधीची पुस्तके

  • डॉ. न.म. जोशी : व्यक्ती आणि वाड्मय (लेखक - डॉ. दिलीप गरुड)

सन्मान आणि पुरस्कार