"रामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1435040 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २६:
* देशाच्या पंतप्रधानांची निवड थेट लोकांमधून करण्यात यावी. त्यामुळे देशहिताचे प्रश्न मार्गी लागून पक्षीय राजकारणाला चाप बसेल.
* जनतेला सरकारी सेवा मिळणे हा त्यांच हक्क आहे. एखाद्या व्यक्तीला सरकारी अधिकार्‍याने विशिष्ट काळात आवश्यक ती सेवा दिली नाही, तर संबंधित अधिकारी दंडास पात्र ठरावा.
 
==रामदेवाबाबांचे आधुनिक हिंदुत्व==
‘भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही लोकांनी तिला बदनाम केले. ज्यांना धर्माचे काही माहीत नाही असे लोक धर्माचा प्रचार करतात. मी धर्म मानतो, पण पाखंड मानत नाही. अनेक लोक राशीभविष्य आणि हस्तरेखांना फार महत्त्व देतात. मी आजवर कधीही मुहूर्त पाहिला नाही. जे केले तोच शुभमुहूर्त होता,’ असे ते म्हणतात.
 
‘सकाळच्या राशीभविष्याला सर्वाधिक टीआरपी असतो. राम आणि रावण, कृष्ण आणि कंस यांच्या राशी एक होत्या. तसेच रामदेव आणि राहुल गांधी यांचीही राशी एक आहे. माझ्या हातावर भाग्यरेखा नसूनही मी अनेकांचे भाग्य बदलले आहे. भूत-प्रेत, शनी, राहू, केतू हे फक्त आपल्यालाच का, आणि चीन, अमेरिका, पाकिस्तान यांना ते का नाहीत? ते असतीलच तर सीमा सुरक्षा दलाऐवजी भुताखेतांचाच वापर करायला हवा. आपण फार अंधविश्वासी असतो. धर्माच्या नावावर याचा धंदा केला जातो. पृथ्वी, सूर्य, चंद्र देवाने बनवले आहे मग त्यांच्यामुळेच बनलेला काळ हा अशुभ कसा असेल! भारतीय संस्कृती वैज्ञानिक आहे, पण काही बाबा कृपा करण्याचा धंदा चालवतात. धर्मात कधीही अवैज्ञानिकता नव्हती.’ संपूर्ण जीवन हाच योग असून आपण एकाग्रतापूर्वक जे करू तो योग’, असेही रामदेव बाबांनी एका भाषणात सांगितले.
 
==रामदेवबाबांचे भारत-पाकिस्तान संबंधांवर विचार==
‘पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. ही गरिबी दूर झाली तर भारत आणि पाकिस्तानमधील शत्रुत्वही नष्ट होईल,’ असे मत रामदेव बाबा यांचे मत आहे. पाकिस्तानमध्ये योग शिकवण्यासाठी जाणाण्याचा त्यांचा विचार आहे. त्याचप्रमाणे ‘यापुढे पाकिस्तानबरोबरच नेपाळ, बांगलादेश आणि आफ्रिका या देशांमध्येही पतंजलीची उत्पादने उपलब्ध होतील,’ अशी घोषणाही त्यांनी केली. रामदेवबाबा म्हणाले, ‘पतंजलीची जीन्स देखील येणार का असा प्रश्न हल्ली मला विचारला जातो. पतंजलीची जीन्स का नसावी? विदेशी कंपन्या भारतात येऊन १ रुपया गुंतवतात आणि शंभर रुपये घेऊन जातात. परदेशी कंपन्या त्यांच्याकडे तंत्रज्ञान असल्याचे सांगून आपल्याला मूर्ख बनवतात. तेल, शाम्पू, साबण तयार करण्यासाठी असे काय तंत्रज्ञान लागते? त्यांच्याकडे तंत्रज्ञान असेलच तर ते घेऊ पण उत्पादन भारतातच करू. पतंजलीने आतापर्यंत १ लाख तरुणांना रोजगार दिला असून पुढील पाच वर्षांत १ लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय करण्याचे उद्दिष्ट आहे.’
 
==पतंजली उद्योग==
Line ७८ ⟶ ८६:
* पतंजली ऑरेंज अॅलो व्हेरा (फेस वॉश)
* पतंजली मुलतानी मिट्टी
* पतंजली बिस्किटे (नमकीन मेरी, दूध, आरोग्य, इलायची डिलाईट, ऑरेंज डिलाईट, नटी डिलाईट, चॉको डिलाईट)
* पतंजली नवरत्‍न सोनपापडी
* पतंजली नमकीन मूगडाळ
* पतंजली चणा डाळ, राजमा (चित्रा), काबुली चणा, काळा चणा, तुरीची डाळ, आख्खे (शाबूत) मूग, मुगाची सालपटासहित डाळ, सालपटाविरहित मूग डाळ, मिश्र डाळ, मलका मसूर, वगैरे)
* अधिक सुमारे ५० उत्पादने.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/रामदेव" पासून हुडकले