"पी. बाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पी. बाळू, पूर्ण नाव बाळू पालवणकर (जन्म : धारवाड, (इ.स. १८७६; मृत्यू : )...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
पी. बाळू, पूर्ण नाव बाळू बाबाजी पालवणकर (जन्म : [[धारवाड]], (१९ मार्च, इ.स. १८७६; मृत्यू : [[मुंबई, ४ जुलै. इ.स. १२५५) हे मुंबईच्या हिंदू जिमखान्यातर्फे क्रिकेट खेळणारे एक फिरकी गोलंदाज होते.
 
भारत फिरकी गोलंदाजीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ह्या प्रकारच्या गोलंदाजीची मुहूर्तमेढ इसवी सन १९००च्या सुमारास पी. बाळू यांनी रोवली. मुरब्बी क्रिकेटपटू [[विजय मर्चंट]]नी लिहिले आहे की की, नवानगरचे महाराजा असलेले फलंदाज रणजितसिंह आणि दलित कुटुंबात जन्मलेल्या गोलंदाज बाळू पालवणकर ह्यांनी भारतीय क्रिकेटला पहिल्यांदा प्रतिष्ठा मिळवून दिली
ओळ ६:
 
त्याची कीर्ती पसरल्यावर त्याला हिंदू जिमखान्याच्या चमूत खेळायला बोलावले गेले. त्याच्या कर्तबगारीच्या जोरावर हिंदू संघाने १९०५ मध्ये प्रथमच मुंबई इलाख्यातली स्पर्धा जिंकली. मग बाळूला आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घ्यायची संधी मिळाली. १९११ च्या अखिल भारतीय चमूच्या इंग्लंडच्या दौर्‍यात त्यांनी पहिल्या श्रेणीच्या सामन्यात सरासरी १९ धावा देत ७५ जणांना बाद करत सर्वांहून सरस कामगिरी करून दाखवली. तरीही कप्‍तान बनवायचे सोडाच, पण बाकीचे खेळाडू त्याला आपल्या पंक्तीत जेवूही द्यायचे नाहीत. या वृत्तीची निर्भर्त्सना करत, लोकमान्य टिळकांनी सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता बाळूचा जाहीर सत्कार केला.
 
पी. बाळू यांना लायकी असूनही टीमचा कप्‍तान होण्याची संधी मिळाली नाही. मात्र ते म्हातारे होऊन निवृत्त झाल्यावर त्यांचा धाकटा भाऊ विठ्ठ्ल पालवणकर हा हिंदू जिमखान्याच्या संघाचा कप्‍तान झाला.
 
==पी. बाळू यांना मिळालेले सन्मान==
"https://mr.wikipedia.org/wiki/पी._बाळू" पासून हुडकले