"पी. बाळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पी. बाळू, पूर्ण नाव बाळू पालवणकर (जन्म : धारवाड, (इ.स. १८७६; मृत्यू : )...
(काही फरक नाही)

१०:४३, १९ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

पी. बाळू, पूर्ण नाव बाळू पालवणकर (जन्म : धारवाड, (इ.स. १८७६; मृत्यू : ) हे मुंबईच्या हिंदू जिमखान्यातर्फे क्रिकेट खेळणारे एक फिरकी गोलंदाज होते.

भारत फिरकी गोलंदाजीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ह्या प्रकारच्या गोलंदाजीची मुहूर्तमेढ इसवी सन १९००च्या सुमारास पी. बाळू यांनी रोवली. मुरब्बी क्रिकेटपटू विजय मर्चंटनी लिहिले आहे की की, नवानगरचे महाराजा असलेले फलंदाज रणजितसिंह आणि दलित कुटुंबात जन्मलेल्या गोलंदाज बाळू पालवणकर ह्यांनी भारतीय क्रिकेटला पहिल्यांदा प्रतिष्ठा मिळवून दिली

१८७६मध्ये जन्मलेल्या बाळूला चरितार्थासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी महिना चार रुपये पगारावर तेव्हाच्या केवळ युरोपीयांसाठी राखीव पूना क्‍लबात क्रिकेटच्या मैदानाची निगा राखण्याची नोकरी पत्करायला लागली. तिथे फावल्या वेळात नेटवर गोलंदाजी करत फिरकीत तो इतका पारंगत झाला की इंग्रज चमूच्या कप्‍तानाने दरवेळी आठ आणे भत्ता देऊन स्वतःच्या सरावासाठी गोलंदाजी करण्याचे काम त्याच्यावर सोपवले.

त्याची कीर्ती पसरल्यावर त्याला हिंदू जिमखान्याच्या चमूत खेळायला बोलावले गेले. त्याच्या कर्तबगारीच्या जोरावर हिंदू संघाने १९०५ मध्ये प्रथमच मुंबई इलाख्यातली स्पर्धा जिंकली. मग बाळूला आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घ्यायची संधी मिळाली. १९११ च्या अखिल भारतीय चमूच्या इंग्लंडच्या दौर्‍यात त्यांनी पहिल्या श्रेणीच्या सामन्यात सरासरी १९ धावा देत ७५ जणांना बाद करत सर्वांहून सरस कामगिरी करून दाखवली. तरीही कप्‍तान बनवायचे सोडाच, पण बाकीचे खेळाडू त्याला आपल्या पंक्तीत जेवूही द्यायचे नाहीत. या वृत्तीची निर्भर्त्सना करत, लोकमान्य टिळकांनी सनातन्यांच्या विरोधाला न जुमानता बाळूचा जाहीर सत्कार केला.

पी. बाळू यांना मिळालेले सन्मान

  • मुंबईतील प्रभादेवी भागातल्या एका रस्त्याला पी. बाळू यांचे नाव दिले आहे.
  • आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडला जाऊन तिथल्या क्रिकेट संघाविरुद्ध दमदार कामगिरी केल्याबद्दल लोकमान्य टिळकांकडून जाहीर सत्कार.