"कांचनगंगा गंधे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या निवृत्त प्राध्या...
(काही फरक नाही)

००:३६, १० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

डॉ. कांचनगंगा गंधे या वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या निवृत्त प्राध्यापिका असून वनस्पतींवर लिहिणार्‍या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्‍यापक म्‍हणून त्या २०१० साली निवृत्‍त झाल्‍या. त्‍यांना शिक्षण क्षेत्रात सत्तावीस वर्षांचा अनुभव आहे. त्‍यांचे एकूण चोवीस शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. गंधे यांनी विविध नियतकालिकांमध्‍ये वन्‍यसंपत्तीबाबत पाचशे पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत.

डॉ. गंधे यांनी वनस्‍पती आणि त्‍यांचे महत्त्व या संबंधात 'आकाशवाणी'वर शंभराहून जास्‍त कार्यक्रम केले आहेत. या विषयाच्या अनुषंगाने त्‍यांचा दूरदर्शनवरील 'सुंदर माझे घर' आणि 'रानभाज्‍या आणि त्‍यांचे उपयोग' या कार्यक्रमांमध्‍ये सहभाग होता.


डॉ.कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेले पुस्तके

  • आपले वृक्ष आपली संपत्ती
  • आरोग्‍यासाठी चार्तुमास
  • गणेश पत्री
  • पर्यावरण आणि वने
  • वृक्षवल्‍ली आम्‍हा...'