"दत्तो वामन पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: बांधणी, replaced: ; मृत्यू : → -
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे.
 
इ.स. १९६२ साली जे शुद्धलेखनाचे नियम मराठी महामंडळाने मान्य केले, त्याखाली दत्तो वामन पोतदारांनी सुचवलेली एक टीप होती. ‘हे नियम असले तरी जुन्या नियमांप्रमाणे केलेले लेखन अशुद्ध आणि त्याज्य मानू नये.’ सुरुवातीला काही वर्षे नियमांच्या यादीखालची ही टीप छापली जात असे.. मात्र पुढे संबंधितांनी ती सोईस्करपणे वगळली..
 
दत्तो वामन पोतदार अविवाहित होते.
 
==मराठी भाषेच्या जतनासाठी आणि संवर्धानासाठी दत्तोपंतांनी सांगितलेला कार्यक्रम==
दत्तोपंत पोतदारांनी मराठीच्या संवर्धनासाठी जो कार्यक्रम सुचवला होता त्यात त्यांनी पुढील मुद्दे सुचवले होते- १) मी प्रत्यक्ष काहीतरी उत्कृष्ट मराठी मजकूर रोज वाचीन. २) मी एक तरी चांगले मराठी पुस्तक प्रतिमासी विकत घेईन. ३) मी एक तरी प्रतिष्ठित मराठी मासिक वर्गणी भरून घेईन. ४) मी आपल्या मुलाबाळांत आणि आप्‍तेष्टांत मराठीचा योग्य अभिमान जागृत करण्यासाठी झटेन. ५) मी रोज एक तरी मराठी वर्तमानपत्र विकत घेईन. ६) शक्य असेल तर माझ्या अज्ञान बांधवांसाठी मी मराठीत ग्रंथ लिहीन. ७) मराठी वाङ्मयेतिहास अभ्यासण्याकरता झटणार्‍या संस्थांना मी शक्य होईल तशी मदत करीन.
 
==दत्तो वामन पोतदारांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यिक कारकीर्द==