"मारुती चितमपल्ली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४०:
 
वडिलांना वाचण्याची आवड तर आईला अरण्यवाटांची. आई, वडील, आत्या, मामा यांच्याबरोबर रानवाटेने चालताचालता जंगलांबद्दल आकर्षण वाटू लागले. ’क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे उडे बापडी’ ह्या कवितेतील कारुण्य शाळेत असताना जाणवले, आणि जंगलांतील पक्ष्यांविषयी प्रेम वाटू लागले. आयुष्यभर हरणाची शिकार करणार्‍या भीमाचा मृत्यू हरणासारखा तडफडत झाला ही आईने सांगितलेली गोष्ट आयुष्यभर विसरता येण्यासारखी नव्हती. आईला पशुपक्ष्यांची खूप माहिती होती. चंडोइल ऊर्फ माळचिमणी, कोकिळा ऊर्फ कोयाळ, सातबहिणी ऊर्फ बोलांड्या, लावा ऊर्फ भुरगुंज्या अशी कितीतरी नावे चितमपल्लींना आईकडून ऐकायला मिळाली. हरणाच्या नराला काळवीट आणि लांडग्याच्या मादीला लासी असा नर-मादीतला फरक तिनेच शिकविला. माळढोक हे नाव पहिल्यांदा आईनेच ऐकवले. तिने दिलेले [[रंग|रंगांच्या]] छटांचे ज्ञान पाखरांच्या आणि फुलपाखरांच्ये वर्णन करताना उपयोगी पडले.
 
==मराठी भाषेला शब्दांची देणगी==
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे. अरण्य आणि त्याभोवताल विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत ‌की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा ‌खजिना उपलब्ध करून दिला आहे.
 
==संस्कृतचा अभ्यास==
रामटेकच्या कालिदास संस्कृत विद्यापीठाच्यावतीने प्राचीन भारतीय साहित्यातील पर्यावरण असा एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविला जातो. चितमपल्ली यांनी ८४व्या वर्षी त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि तो पूर्णही केला.
 
लिंबामामा हा मारुती चितमपल्लींचा अरण्यविद्येतला पहिला गुरू. त्याने (काम चालू)
 
;==मारुती चितमपल्ली यांचीयांनी ग्रंथलिहिलेली संपदा:पुस्तके==
* [[आनंददायी बगळे (संस्कृत साहित्यातील काही पक्षी)]], (२००२)
* आपल्या भारतातील साप
* [[केशराचा पाऊस]]
* [[घरट्यापलीकडे]], (१९९५)