"ह्युस्टन स्मिथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. ह्युस्टन कमिंग्ज स्मिथ (जन्म : चीन, ३१ मे, इ.स. १९१९; मृत्यू : बर...
(काही फरक नाही)

१६:०४, ७ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

प्रा. ह्युस्टन कमिंग्ज स्मिथ (जन्म : चीन, ३१ मे, इ.स. १९१९; मृत्यू : बर्कले-कॅलिफोर्निया (अमेरिका), ३१ डिसेंबर, २०१६) हे विविध धर्मग्रंथांचा आणि धर्मशास्त्राचा आयुष्यभर आणि अफाट व्यासंग करणारे एक विद्वान होते.

शिक्षण आणि अध्यापन

१७ वर्षे चीनमध्ये राहिल्यानंतर ह्युस्टन स्मिथ शिक्षणासाठी अमेरिकेत आले. शिकागो विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. नंतर त्यांनी स्वामी सत्प्रकाशानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू वेदान्ताचा, बौद्ध धर्माचा आणि सूफी इस्लामचा अभ्यास केला. त्यानंतर स्मिथ यांनी १९४४ ते ४९ या कालावधीत डेन्व्हर विद्यापीठात धर्मशास्त्राचे अध्यापन केले. तेथून ते वॉशिंग्टन विद्यापीठात गेले. तेथे दहा वर्षे शिकवण्याचे काम केल्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.