"श्री.द. महाजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. श्री. द. महाजन हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. वनस्पतीं...
(काही फरक नाही)

१८:४५, ६ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

प्रा. श्री. द. महाजन हे एक मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्राचे तज्ञ, देवरायांचे अभ्यासक, जंगल-वनांची डोळस भटकंती करणारे संशोधक आणि स्वतःकडील ज्ञानभांडार मुक्तपणे कोणालाही देण्यासाठी सतत तयार असलेले ते एक निसर्गप्रेमी आहेत.

प्रा. श्री. द महाजन यांनी कोल्हापूर येथे निसर्ग मित्र मंडळ स्थापन केले होते आणि या मंडळातर्फे देवराई वाचवा ही चळवळ त्यांनी उभी केली. पुण्यातही त्यांनी निसर्गाची ओळख करून देण्याचे आणि निसर्गसंवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले असून निसर्ग सेवक संघातर्फे घेण्यात येणार्‍या परिचय वर्गातही महाजन यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अनेक संस्था आणि महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक म्हणूनही ते काम करतात. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे अध्यक्ष आणि पुण्यातील एम्प्रेस गार्डनचे विश्वस्त या पदांवर सध्या ते काम करत आहेत. (इ.स.२०१३)

प्रा. श्री.द. महाजन यांनी लिहिलेली पुस्तके

  • आपले वृक्ष
  • देशी वृक्ष
  • निसर्गभान

महाजन यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • पुणे महापालिकेतर्फे खास सत्कार (५ जून २०१३)

वर्गं:मराठी शास्त्रज्ञ