"हरि वामन लिमये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ३३:
==चरित्र==
वामन लक्ष्मण लिमये व सरस्वती वामन लिमये यांच्या ३ मुले आणि ५ मुली अशा एकूण ८ अपत्यांपैकी हरिभाऊ हे ५वे अपत्य होय. अवघ्या १६ वर्षांच्या वयात ब्रिटिशांच्या दडपशाहीला विरोध करण्यासाठी हरिभाऊ व त्यांच्याहून वयाने थोड्या मोठय़ा तरुणांनी [[पुणे]] शहरातल्या छावणी परिसरातील कॅपिटॉल, एम्पायर, वेस्टएन्ड या चित्रपटगृहांत बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ४ ब्रिटिश अधिकारी व कर्मचारी मारले गेले. पोलिसी हिसका दाखवूनही सहकारी पकडले जातील म्हणून त्यांनी आपल्या सहकार्‍यांची नावे गुप्त ठेवली. त्यांच्यावर भरलेल्या खटल्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास झाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेऊन वकिली करण्यास प्रारंभ केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीदरम्यान तुरुंगात डांबलेल्या कार्यकर्त्यांचे विनामोबदला वकीलपत्र घेऊन त्यांनी अनेकांची सुटका केली. <ref>[http://beta1.esakal.com/pune/haribhau-limaye-dies-24020 | स्वातंत्र्यसेनानी हरिभाऊ लिमये यांचे निधन ]</ref> [[गोवा मुक्तिसंग्राम]]ातही त्यांचा सहभाग होता.|
 
==मसाजिस्ट हरिभाऊ==
हरिभाऊ लिमये यांचे आजोबा लक्ष्मण लिमये यांनी त्यांच्या काळात भारतीय उपचार पद्धतीमधील मोफत मसाज केंद्र पुणे शहरातील त्यांच्या घरीच सुरू केले होते. त्यांच्यानंतर हा वारसा त्यांचे ज्येष्ठ पुत्र वामन ऊर्फ महाराज लिमये यांनी सुरू ठेवला. महाराज लिमये यांचे हरिभाऊ धाकटे चिरंजीव. श्रीकृष्ण लिमये आणि पुण्याचे माजी महापौर [[निळूभाऊ लिमये]] हे हरिभाऊंचे ज्येष्ठ बंधू होत.
 
पुण्यातील या '''महाराज लिमये मसाज केंद्राद्वारे''' लिमये कुटुंबियांनी हजारो रुग्णांची तुटलेली हाडे मोफत सांधून दिली.
 
== साहित्य ==