"ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ज्ञानपीठ पुरस्कार==
पहिला ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना ‘ओडोक्वुफल’ (वेळूची बासरी) या महाकाव्याबद्दल हा प्रथम पुरस्कार देण्यात आला.
 
१९६५ ते २०१५ पर्यंत एकूण ५१ ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आले; पण गौरव ५६ साहित्यिकांचा झाला. कारण आत्तापर्यंत पाच वेळा हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. पुरस्कार सुरू झाल्यापासून सिंधी या भारतीय भाषेतील साहित्यास अद्यापि पुरस्कार लाभलेला नाही. सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे; कन्नड भाषेला आठ वेळा, तर मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.
 
१९७४चा दहावा ज्ञानपीठ पुरस्कार मराठीने पटकावला. वि. स. खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीस हा पुरस्कार देण्यात आला. ‘ययाति’च्या रूपाने शाश्वत मूल्यांची आठवण भाऊसाहेब खांडेकर यांनी करून दिली आहे. या साहित्यकृतीची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्या वेळी भाषा सल्लागार समितीत (L.A.C.) मराठी भाषेसाठी डॉ. य. दि. फडके, डॉ. अशोक केळकर आणि कवी मंगेश पाडगावकर हे होते. मध्यवर्ती निवड समितीत प्रा. मं. वि. राजाध्यक्ष यांचा समावेश होता. त्यानंतर चौदा वर्षांनी म्हणजे १९८७ चा ज्ञानपीठ पुरस्कार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांना मिळाला आहे. मराठी मायबोलीचा पुन्हा एकदा गौरव झाला. या वेळी भाषा सल्लागार समितीमध्ये मराठी भाषेसाठी प्रा. बाळ गाडगीळ, प्राचार्य म. द. हातकणंगलेकर आणि डॉ. श्रीमती सरोजिनी वैद्य हे तिघे जण होते. मध्यवर्ती निवड समितीत डॉ. श्रीमती विजया राजाध्यक्ष यांच्यासह इतर नऊ सदस्य होते.
 
२००३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विंदा करंदीकरांना तर २०१४ चा भालचंद्र नेमाडे यांना मिळाला.
 
 
==ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक==
 
Line १० ⟶ २०:
|- Align="Center"
| [[इ.स. २००३]] || [[विंदा करंदीकर]] || [[अष्टदर्शने]]
|- Align="Center"
| [[इ.स. २०१४]] || [[बालचंद्र वनाजी नेमाडे]] || [[हिंदू : एक समृद्ध अडगळ]]
 
|}