"ज्योत्स्ना कार्येकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ज्योत्स्ना कार्येकर (जन्म : इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई, ३१ डिसेंबर, इ.स....
(काही फरक नाही)

१८:०७, २ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

ज्योत्स्ना कार्येकर (जन्म : इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई, ३१ डिसेंबर, इ.स. २०१६) या मराठी प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवर एक काळ गाजवणार्‍या आणि जाहिरात, मालिका व सिनेक्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या एक मराठी अभिनेत्री होत्या. कामेरकर हे त्यांचे माहेरचे आडनाव.

ज्योत्स्ना कार्येकर या ‘एचएमव्ही’ या ध्वनिमुद्रिका बनविणार्‍या कंपनीचे वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत्या. वसंतराव कामेरकर यांच्या घरी दिग्गज गायकांच्या मैफली रंगायच्या आणि नाटकाच्या तालमीही व्हायच्या. कलेचा हा वारसा ज्योत्स्ना कार्येकर यांच्यासह सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे, आशा दंडवते या त्यांच्या अभिनेत्री बहिणींनाही लहानपणापासूनच मिळाला. या सर्व बहिणींनी अभिनय क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

अन्य कुटुंबीय

  • अभिनेता यतीन कार्येकर यांच्यासह डॉ.प्रफुल्ल व डॉ.चेतन हे पुत्र.

ज्योत्स्ना कार्येकर यांचा अभिनय असलेली नाटके

  • आधेअधुरे
  • काचेचा चंद्र
  • गिधाडे
  • गौराई
  • माणूस नावाचे बेट


ज्योत्स्ना कार्येकर यांचा अभिनय असलेले चित्रपट

  • कथा
  • कहानी घर घर की (हिंदी)
  • राख
  • जोश (हिंदी)
  • सत्त्या

ज्योत्स्ना कार्येकर यांचा अभिनय असलेल्या दूरचित्रवाणी मालिका

  • कहानी घर घर की (या हिंदी मालिकेत त्यांनी साकारलेली नानी ही भूमिका अतिशय गाजली).
  • राजा की आयेगी बारात (हिंदी)
  • शांती (हिंदी)
  • साथ निभाना साथिया (हिंदी)