"बळवंत मोरेश्वर पुरंदरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ६३:
 
==दानशूरता==
बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाकलाख रुपयांतले फक्त दहा पैसे त्यांनी स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली.
 
==महाराष्ट्रभूषण==
बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार जेव्हा जाही केला तेव्हा अनेक मराठा जातिधारक संस्थांनी विरोध केला. त्यांच्या मते बाबासाहेब हे एक ्ललित लेखक असून इतिहाससंशोधक नाहीत. त्यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकात चुकीची आणि शिवाजीची बदनामी करणारी माहिती छापली आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पुरंदरे यांच्या योग्यतेचे दाखले घेऊन त्यांच्या समर्थनासाठी अनेक जण मैदानातही उतरल्याने, राजकीय मैदानात सुरू झालेल्या या लढय़ाला आता वैचारिक स्वरूप प्राप्त होणार असे दिसू लागले होते.
 
हा पुरस्कार बाबासाहेबांना याआधीच द्यायला हवा होता, असा दावा करणारे एक निवेदन आता पुरंदरे विरोधकांशी सामना करण्याकरिता सज्ज झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कारकिर्दीचा आणि कर्तृत्वाचा संपूर्ण आलेखच या निवेदनाद्वारे मांडण्यात आला असून बाबासाहेबांना इतिहास संशोधक म्हणून मान्यता देणार्‍या मान्यवरांची यादीच त्यामध्ये नमूद करण्यात आली आहे. राजमाता [[सुमित्राराजे भोसले]], माजी राष्ट्रपती [[प्रतिभा पाटील]], माजी उपपंतप्रधान [[यशवंतराव चव्हाण]], माजी मुख्यमंत्री [[वसंतदादा पाटील]], शिवसेनाप्रमुख [[बाळ ठाकरे]], माजी पंतप्रधान [[अटलबिहारी वाजपेयी]], इतिहास संशोधक [[न.र. फाटक]], कवी [[कुसुमाग्रज]], [[सेतुमाधवराव पगडी]], [[आचार्य अत्रे]], [[शिवाजीराव भोसले]], [[नरहर कुरुंदकर]], [[लता मंगेशकर]], डॉ. [[रघुनाथ माशेलकर]], डॉ. [[विजय भटकर]] आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे. [[डी.वाय. पाटील]] यांच्या अभिमत विद्यापीठाने तर त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन १४ एप्रिल २०१३ रोजी गौरविले होते, याकडे या निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक दस्तावेजांचा सखोल अभ्यास करून लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथासह अनेक पुस्तके, देश-विदेशातील १२ हजारांहून अधिक व्याख्याने, ‘जाणता राजा’सारखे आशिया खंडात गाजलेले महानाट्य, या सार्‍या तपस्येतून बाबासाहेबांनी तब्बल ७५ वर्षे शिवचरित्र तीन पिढ्यांपर्यंत पोहोचविले. दादरा नगरहवेली मुक्ती लढ्याचे ते स्वातंत्र्यसैनिक आहेत, आणि पुणे विद्यापीठाच्या ‘मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात संशोधक म्हणूनही ते सहभागी झाले आहेत, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
‘वाढलेल्या वयाचा विचार करून हा पुरस्कार देणे गैर आहे’ असे म्हणणार्‍यांनी, वयाच्या चौदाव्या वर्षांपासून इतिहासाशी आणि विशेषत शिवचरित्राशी एकरूप होऊन त्यामध्ये झोकून देणार्‍या या व्यक्तिमत्त्वाच्या तपश्चर्येची आदरपूर्वक नोंद घेतली पाहिजे व पूर्वग्रह बाजूला ठेवले पाहिजे, असे आवाहनही या निवेदनात करण्यात आले होते. या निवेदनावर माजी खासदार प्रदीप रावत, [[अविनाश धर्माधिकारी]], इतिहास संशोधक [[गजानन भास्कर मेहेंदळे]], [[पांडुरंग बलकवडे]], शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू [[द.ना. धनागरे]], मृणालिनी [[शिवाजीराव सावंत]], भारत इतिहास संशोधन मंडळाचे श्री.मा. भावे, इतिहास व मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ. [[गो.बं. देगलूरकर]] आदींच्या स्वाक्षर्‍या होत्या.
 
===बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले ललित साहित्य===
* आग्रा
Line ७८ ⟶ ८६:
* मुजर्‍याचे मानकरी
* राजगड
* राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार - हेमा हेर्लेकर)
* लालमहाल
* शिलंगणाचं सोनं
Line ८५ ⟶ ९३:
* सिंहगड
 
===ध्वनिफिती===
===ध्वनी फिती===
* बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन - भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)
* शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट