"अगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्...
(काही फरक नाही)

१६:०४, २१ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

अगर हा एक एक मोठा वृक्ष आहे. हा भारतातील ईशान्येकडील हिमालयीन प्रदेशात विशेषत: त्रिपुरा, भूतान, बंगाल गारो, खांसिया, नागालँड, काचार, सिल्हेट वगैरे इलाख्यांतील जंगलांत आढळतो. हा भारतातील त्रिपुरा राज्याचा राज्यवृक्ष आहे.

अगर वृक्षाच्या बुरशी आलेल्या खोडापासून सुगंधी द्रव्ये बनतात. झाडाच्या ढलप्यांमधून अंशत: तेल काढून घेतल्यानंतर उरलेल्या ढलप्याच्या अगरबत्त्या (उदबत्त्या) बनतात.

अगरवृक्षाची अन्य नावे

  • अरबी - ऊद
  • इंग्रजी - Iron Wood, Eagle Wood
  • गुजराथी - अगर
  • जपानी - को
  • तमिळ - आगलिचंद
  • तेलुगू - अगुई
  • बंगाली -अगरु
  • मराठी अगर, ऊद
  • शास्त्रीय नाव - Aquilaria malaccensis
  • संस्कृत - अगरि, कृमिजग्ध, लोह
  • हिंदी- अगर