"देवदीपावली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|देव दिवाळी}}
 
देवदीपावली हा [[खंडोबा]]च्या देवस्थानांमध्ये साजरा होणारा एक उत्सव आहे. हा [[मार्गशीर्ष]] शुद्धमहिन्याचा प्रतिपदेपासूनपहिलाचा तेदिवस [[मार्गशीर्ष]]म्हणजे शुद्धदेवदीपावली षष्ठीपर्यंतकिंवा ([[चंपाषष्ठी]]पर्यंत)मोठी साजरा होतोदिवाळी. या दिवशी [[खंडोबा]]च्या (मल्हारी मार्तंडाच्या) देवळात दीपोत्सव करतात.
 
देवदीपावलीचा दिवस हा मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा दिवस असतो. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.
 
त्याच दिवशी मल्हारी नवरात्रही सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत [[चंपाषष्ठी]]चे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.