"खंडोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ३:
|वर्ष = २०११
}}
'''खंडोबा''' किंवा खंडेराय हे मुख्यत्वे [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]], [[आंध्र प्रदेश]] या राज्यातील लोकप्रिय [[हिंदू]] दैवत आहे. हे दैवत [[महाराष्ट्र]]ातील अनेकांचे [[कुलदैवत]] आहे. प्रामुख्याने मराठा, रामोशी (नाईक), धनगर समाजचे लोकांचे कुलदैवत मानले जाते. परंपरेने ''खंडोबा'' हा [[शंकर|शंकराचा]] अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या [[पत्नीपत्‍नी]]; हेगडे हा [[प्रधान]] (हा बाणाईचा भाऊ आहे); आणि [[कुत्रा]] आणि [[वाहन]] [[घोडा]] यांचा समावेश होतो.<ref name="मराठी विश्वकोश">मराठी विश्वकोश</ref> खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात [[डमरू]], [[त्रिशूळ]], खंडा (अतिशय मोठी आणि जड तरवार) आणि पानपत्र ;असून तो चतुर्भुज; कपाळाला भंडारा असेलावलेल्या रूपरूपात असतेअसतो..<ref name="मराठी विश्वकोश"/>
 
[[चित्र:The origanal photo of god Khandoba temple devhara of Jejuri.jpg|thumb|right|305px| खंडोबाचे मूळ पीठ [[जेजुरी]] येथील गाभार्‍यातील [[मूर्ती]]समूह]]
 
==नावे==
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा ([[संस्कृत]] [[खड्ग]] -> [[मराठी]] खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्यादुसर्‍या मतानुसार हा [[संस्कृत]] ''स्कंद'' शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. ''मल्लू खान'' आणि ''अजमत खान'' (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या [[मुसलमान]] भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा [[शस्त्र|शस्त्रास]] ''मल्लू खान की [[गदा]]'' अशा नावाने संबोधतात. ''मल्ह / मल्ल + अरी'' अशी मल्हारी शब्दाची फोड असून ''मल्ल राक्षसाचा शत्रू'' असा त्याचा अर्थ आहे. ''म्हाळसेचा पती'' म्हणून खंडोबास ''म्हाळसाकांत'' असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
 
[[कर्नाटक|कर्नाटकात]] खंडोबास ''मैलार'' किंवा ''खंडू गौडा'' (स्वैरपणे: खंडू पाटील) तर [[आंध्र प्रदेश|आंध्रात]] ''मल्लाण्णा'' नावाने ओळखतात.
ओळ २०:
==दैवत==
[[File:Khandoba Mhalsa fighting demons.jpg|left|thumb|खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)]]
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे.<ref name="मराठी विश्वकोश"/> खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात.<ref name="माटे">माटे</ref> खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ ''मल्हारी माहात्म्य'' सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही.<ref>Sontheimer in Bakker p.103</ref> मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक [[शिव]] व वैदिक [[रुद्र]] यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या [[पार्वती]] व [[गंगा]] यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा [[कृष्ण|कृष्णाचा]] तर शुभ्र घोडा [[नंदी]]चा अवतार मानला गेला.<ref>Stanley in Hiltebeitel p.278</ref> खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. [[महानुभाव पंथ|महानुभाव पंथीय]] [[चक्रधर]] स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. [[आंध्र प्रदेश|आंध्राच्या]] काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. ''मल्हारी माहात्म्य'' ग्रंथातील ''प्रेमपुरी'' जागा [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[बिदर]]जवळचे ''आदी मैलार'' स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> [[नळदुर्ग]] -> पाली (जि. सातारा) असे करत [[जेजुरी]]स स्थिरावला.<ref>Sontheimer in Bakker p.105</ref> मराठी परंपरेत खंडोबा ''कानडी देव'' मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, [[जैन]] व इतर व्यापाऱ्यांनीव्यापार्‍यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. [[पैठण]]च्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.
 
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. [[एकनाथ|एकनाथांनी]] या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून ''कमी प्रतीचे दैवत'' मानले गेले.{{संदर्भ हवा}} खेळखंडोबा हा वाक्प्रचार ''सर्वनाश'' या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
ओळ २६:
[[महात्मा फुले]] यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील [[महाराष्ट्र]] क्षेत्राचा अधिपती मानले आहे. [[महाराष्ट्र]] क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. [[जेजुरी]]चा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.<ref>महात्मा फुले समग्र वाङ्‌मय प्रकाशक साहित्य आणि संस्कृती मंडळ, सहावी आवृत्ती पृष्ठ १५९</ref>
 
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली [[खटाव]]च्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला.<ref name="माटे"/> बंगाली संत [[चैतन्य महाप्रभू]] यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्नप्रय्त्‍न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, [[मल्हारराव होळकर]] वगैरेंचे उल्लेख येतात. [[नारायणराव पेशवे|नारायणरावाच्या]] हत्येनंतर [[नाना फडणीस]] यांनी नारायणरावाची गरोदर पत्नीपत्‍नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे [[पेशवे]] दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.<ref name="माटे"/>
 
==कुळाचार==
ओळ ९३:
==खंडोबाच्या लग्नकथा==
[[File:Vaghya.jpg|left|thumb|एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.]]
खंडोबा हे दैवत बहुपत्‍नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्‍नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नीपत्‍नी म्हाळसा [[लिंगायत]] असून दुसरी पत्‍नी बाणाई (वा पालाई) [[धनगर]] आहे. तिसर्‍या पत्नीचेपत्‍नीचे नाव रभाई आहे. चौथी पत्‍नी फुलाई जातीने [[तेली]]ण आहे तर पाचवी चांदाई [[मुस्लिम]] आहे. ''मल्हारी माहात्म्य'' या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्‍न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व [[पार्वती]] यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा [[नेवासे|नेवाश्याच्या]] तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्याव्यापार्‍याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
 
दुसरी पत्‍नी बाणाई (बनाई ?) [[इंद्र|इंद्राची]] मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला [[जेजुरी]] येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नीपत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत [[सारीपाट|सारीपाटाचा]] डाव मांडला. डाव हरणाऱ्यासहरणार्‍यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. [[जेजुरी]]च्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी [[जेजुरी]] डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून [[जेजुरी]]गडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.
 
==दंतकथा==
ओळ १०४:
 
==उत्सव/यात्रा==
* जेजुरी : वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधिपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्रा उत्सवांचे स्वरूप असते. [[सुपा|सुप्याचे]] खैरे, [[संगमनेर]]चे होलम आणि [[इंदूर]]च्या होळकरांना पालखीचा मान असतो.[[डफ]], [[मर्फा]],[[सनई]], [[ताशा]] आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. [[जेजुरी]]गडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे [[पौष]] यात्रेचे आकर्षण आहे.
सोमवती अमावस्येस (सोमवारी येणार्‍या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. खंडोबाच्या पालखीला खांदा देण्याचा मान फक्त रामोशी (नाईक), धनगर समाजा कडे आहे. नंतर त्यांच्या प्रतिमांना [[कऱ्र्‍हा नदी]]वर स्नान घातले जाते.
* नळदुर्ग : [[नळदुर्ग]] येथिल मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नावः पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.
* पाली ([[सातारा जिल्हा]]) : पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अयीत गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो.
 
== स्थाने ==
"https://mr.wikipedia.org/wiki/खंडोबा" पासून हुडकले