"शंकर शेष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ.शंकर शेष (जन्म :विलासपूर, महाराष्ट्र, २ ऑक्टोबर,इ.स. १९३३) हे एक म...
(काही फरक नाही)

०६:५५, १७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

डॉ.शंकर शेष (जन्म :विलासपूर, महाराष्ट्र, २ ऑक्टोबर,इ.स. १९३३) हे एक मराठीत आणि हिंदीत लिहिणारे नाटककार आहेत.

डॉ. शेष यांच्या कुटुंबात नृत्य, नाटक व संगीताची आवड होती. साहजिकच डॉ. शेषना त्याची आवड निर्माण झाली. लहानपणापासून ते कथा, कविता लिहायचे. इंटरमीडिएट झाल्यावर त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याचवेळी, १९५५ मध्ये त्यांनी पहिली एकांकिका ‘मूर्तिकार’ लिहिली. तिथेच एम.ए. केल्यावर काही दिवस अध्यापकाची नोकरी केली. त्याच काळात त्यंनी ‘हिंदी-मराठी कथेचं तुलनात्मक अध्ययन’ या विषयावर पी.एच.डी. मिळवली.

त्यानंतर छत्तीसगढमध्ये ‘आदिम जाती अनुसंधान संस्थान’ या संस्थेमध्ये त्यांची नियुक्ती झाली. या पूर्ण कालखंडात डॉ. शेष समाज, परंपरा, रूढी व सामाजिक, राजकीय परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करीत होते. तिथले अनुभव, घटना यांवर आधारित त्यांनी ‘बाढ का पानी’सारखी नाटके लिहिली.

‘बाढ का पानी’ या नाटकात शंकर शेष यांनी भारतीय समाजातील अस्पृश्यतेसारख्या कुप्रथेबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या ‘महाभारता’च्या वाचन आणि चिंतनातून त्यांनी ‘कोमल गांधार’ आणि ‘एक और द्रोणाचार्य’ ही दोन नाटके लिहिली गेली. ‘कोमल गांधार’ नाटकात गांधारी तिच्यावरील अन्यायाच्या विरोधात संघर्ष करू पहाते. कौरवांना उत्तराधिकारी मिळावा म्हणून भीष्म व धृतराष्ट्र गांधारीचा उपयोग करतात. तिला फसवले जाते. लेखकाने या नाटकात फक्त समकालीन संदर्भच नव्हे, तर प्राचीन मिथक-अर्थात महाभारतातील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक आणि स्त्री-पुरुष संघर्षाबद्दल मार्मिक चर्चा केली आहे.

महाभारतातल्या युद्धानंतर नाटकातील पराजित गांधारी व धृतराष्ट्राला जाणीव होते की अन्यायाचे उत्तर प्रतिअन्याय नसून अन्याय दूर करणे आहे. नाहीतर भीष्मासारखी शक्ती दहशतीच्या बळावर माणसाच्या इच्छा व अधिकारांचे दमन करणार. स्त्री-पुरुष एकमेकांविरुद्ध नव्हे तर अन्यायाविरुद्ध लढले तर माणुसकीचा विजय होईल. देशातील अराजक विरुद्ध माणुसकीचा संदेश देणारे हे वेगळेच, कोमल, कठोर, सार्थक विचार करायला लावणारे नाटक आहे.


डॉ. शंकर शेष यांनी लिहिलेली हिंदी-मराठी नाटके

  • अपने अपने
  • अरे! मायावी सरोवर
  • आधी रात के बाद
  • एक और द्रोणाचार्य
  • कोमल गांधार
  • खजुराहों का शिल्पी
  • चेहरे
  • पोस्टर
  • फंदी
  • बंधन
  • बाढ का पानी
  • मूर्तिकार
  • रक्तबीज